ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : उपविभागातील शैक्षणिक क्रांती घडवून आणणारी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था ही नेहमीच धार्मिक क्षेत्रातील कार्यावर तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे कौतुकास्पद अभिनंदन व्हायलाच हवे करीता संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी “आदर्श श्री दूर्गा उत्सव स्पर्धा” या नवरात्रीत आयोजन केली होती. याचा ( सोम. १४ ऑक्टों.ला ) नवजीवन विद्यालय नागझिरा रोड साकोलीत शानदार बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या बक्षीस वितरण सोहळ्याला मंचावर अध्यक्ष माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. सोमदत्त करंजेकर, रेखा भाजीपाले, इंद्रायणी कापगते, जि.प.स. माहेश्वरी नेवारे, प्रा. होमराज कापगते, प्रदीप गोमासे, माजी नगरसेवक मीना लांजेवार, रवी परशुरामकर, प्रा. अमोल हलमारे, भोजराम कापगते, उषा डोंगरवार, भगवान पटले, ताराचंद लंजे, धनवंता राऊत हे उपस्थित होते.
येथे “आदर्श दूर्गोत्सव मंडळ स्पर्धा” जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३१ हजार श्री सार्वजनिक नवदूर्गा उत्सव मंडळ गांधी चौक लाखांदूर, द्वितीय पारितोषिक ३१ हजार नवदूर्गा महिला उत्सव मंडळ सावरी/मुरमाडी लाखनी तर तृतीय पारितोषिक ११ हजार नवचैतन्य दूर्गोत्सव मंडळ पोहरा ता. लाखनी यांनी पटकाविले.
तर यात सर्व स्पर्धकांना विविध गटांमध्ये २१, ११, ५ हजारांच्या बक्षिसांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व सर्व नवदूर्गोत्सव मंडळांचा सामाजिक बांधिलकी जपणा-या सर्व नवदूर्गोत्सव मंडळांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देत गुणगौरव करण्यात आला.
यातील सर्व पर्यवेक्षकांनाही प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संचालन संजय निंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी केले.
याप्रसंगी ते म्हणाले की, खरंच मला सौभाग्य प्राप्त झाले की आज माझ्या मातृभूमित बुद्धीचे दैवता गणपती बाप्पा आणि शक्तीची देवता माता जगदंबा आईंच्या भक्तजणांचे मला गुणगौरव करण्याचा मान मिळाला. आणि आई जगदंबेच्या कृपेने मला आज सर्व जनतेची सेवा करण्याचे महान सौभाग्य प्राप्त झाले ते श्रेय यांचेच.