
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- नागपूर जिल्ह्यातील आदिवासीबाहुल्य व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला पारशिवनी तालुका आहे.पेंच प्रकल्प,नवेगाव धरण आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती कोलितमारा,दोन राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडविते.
बारमाही वाहणाऱ्या कन्हान व पेच नदीनं शेतीला सिंचनाच्या सोयी तर मिळाल्याच,त्यासोबत शेतकऱ्यांच्या घरी समृद्धीही नांदायला लागली.धार्मिक उत्सवाची पर्वणी आणि पुरातन मंदिराने तालुक्याच्या वैभवात अधिक भर घालतात.
असाच एक परिसर पारशिवनी तालुक्यात ग्राम पंचायत टेकाडी कान्हादेवी हद्दीतील कान्हादेवी माँ दुर्गा मंदिर देवस्थान येथे येणाऱ्या प्रत्येकाला भावतो.त्याची पावले आपोआपच या ठिकाणी पडू लागतात.
‘माँ दुर्गा देवस्थान कान्हादेवी परिसर’ म्हणून या धार्मिक स्थळाची ओळख आहे.भाविकांना नैसर्गिक अनोख्या आत्मभूतीचं समाधान या ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा ओघ सदैव या स्थळाकडे असतो.
या मंदिराची स्थापना २००३ मध्ये रत्नप्रभा कृष्णराव डोनारकर यांनी केली.पारशिवनी वरून १९ किलोमीटर लांब असलेल्या सकरला फाटा वरून या देवस्थानाला जाण्यासाठी सर्व दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
कान्हादेवी (टेकाडी) ग्रामपंचायत या गावाची लोकसंख्या ५२२ इतकी आहे.हा संपूर्ण परिसर थंड हवेचं ठिकाण म्हणूनही ओळखला जातो.पारशिवनीच्या अगदी हाकेच्या अंतरावरील हक्काचं प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही माँ दुर्गा देवस्थान कान्हादेवीची ओळख होऊ लागली आहे.
आनंद,समाधान,निसर्ग अगदी जवळून टिपण्याचा योग या परिसराला भेट दिल्यानं नक्की पूर्ण होतो.या देवस्थान समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचे राजाराम रामचंद्र डोनारकर यांनी सूत्रे स्वीकारली.या परिसराचा सर्वांगीण विकास करायचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे.त्यासोबत लगतच्या गावांच्या विकासाचा ध्यासही त्यांनी घेतला आहे.
***
रामरोटी’ची संकल्पना आहे…
कान्हादेवी देवस्थान तर्फे गावकऱ्यांसाठी अम्ब्युलन्स सेवा,दवाखाना,भक्तनिवास,गौशाळा,दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणं,भव्य महाप्रसाद आयोजन म्हणून ‘रामरोटी’ची संकल्पना आहे.
या उपक्रमाला राबविण्याचा कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं त्यांचा मानस आहे. प्रत्येकांनी या स्थळ नक्कीच भेट द्यायला हवी.
**
नागपूर जिल्हा सौंदर्यानी नटलेले..
नागपूर जिल्हा निसर्ग सौंदर्यान नटलेला असून जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात १९ किलोमिटर अंतरावर असलेल्या कन्हानदेवी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नवरात्रीला फार मोठी आहे.
अभयारण्य असो की देवस्थान पर्यटकांसह भक्तांची रेलचेल नेहमीच बघायला मिळते.पेंच आणि उमरेड-कन्हांडला अभयारण्य तर दुसरीकडे रामटेक,अदासा, आंभोरा,पारडसिंगा आदी ठिकाणी भक्तीचा महापूर ओसंडून वाहताना दिसतो.
असेच निसर्ग सौदर्यानं नटलेलं पारशिवनी तालुक्यातील टेकाज कान्हादेवी ग्राम पचायती हदीतील ‘कान्हादेवी माँ दुर्गा देवस्थान’ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कान्हादेवी येथिल मॉ दुर्गा मंदिर येथे बहुसंख्येने भक्तगण घट स्थापना करून परिसरात होणाऱ्या लहान-मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून भाविक माँ दुर्गेची उपासना करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा प्रगट करतात.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात देवस्थानासह कन्हान नदी व पेच नदी आणि हिरवी हिरवी शेतं डोळ्यांचे पारणे फेडतात.
गाव लहान असले तरी दुर्गा मातेच्या मंदिरानं नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे भाविकांची पावलेही या मंदिराकडे वळताना दिसत आहे. येथे जाण्यासाठी दळणवळणाच्या सोयी असल्यामुळे भाविकांना एका दिवसात जाऊन आत्मभूतीचं समाधान मिळविता येत हे विशेष..