उमेश कांबळे ता प्र भद्रावती
दिनांक 12 ऑक्टोंबर ला शिवरकर सोसायटी येथील चालणाऱ्या मच्छी मार्केट पासून होणाऱ्या दुर्गंधी वासामुळे आणि मुख्य रस्त्यावरील उलट सुलट लावलेल्या दुचाक्यामुळे येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. समस्येचा डोंगर खेचत शिवरकर वार्ड वासियांनी मुख्याधिकारी सूर्यकांत पीदूरकर यांना निवेदन सादर केले.
भद्रावती तालुक्यातील व शहरातील चालणारा मच्छी मार्केट व्यवसाय हा एकमेव असून येथे मच्छी खरेदी विक्री करण्यासाठी गावोगावून ग्राहक येत असतात. आणि त्यांच्या लावलेल्या कमी जागेच्या अभावी उलट सुलट दुचाक्यामुळे तेथील स्थानिक शिवरकर सोसायटीतील वार्ड वासीयांना येणाऱ्या या मुख्य रस्त्यावरून कमालीची कसरत करावी लागते. सदर मच्छी मार्केट लगत प्राचीन हनुमान मंदिर देवस्थान असून नगर परिषद प्रशासनाने त्या ठिकाणी मुलांची खेडनी साहित्य लावलेली आहे. जवळच बारई समाजाची प्राचीन देवीचे मंदिर सुद्धा आहे. आणि नेमका त्याच ठिकाणी चालणारा मच्छी मार्केट व्यवसाय व होणाऱ्या दुर्गंधी वासामुळे वार्डवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे, समस्येचा डोंगर खेचत त्यांनी आपली धाव नगर परिषद प्रशासनाकडे घेतली आहे. हा चालणारा मच्छीमार व्यवसाय त्वरित बंद करावा अन्यथा प्रशासनासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवरकर सोसायटी वार्डवासी यांनी दिला आहे. सदर निवेदन देताना वार्डातील सोनाबाई जगताप, किरण घोडमारे, भावना जांभुळे, सुरेखा जांभुळे, श्रुतिका जुनघरे बारापात्रे, संगीता कुचनकर, मंगला मांडवकर ,शकुंतला तुरारे शीला आगलावे, रजनी कांबळे , संगीता ताजने ज्योती लांबट मंगला शेळके वैशाली निखाडे रूपाली बोरीकर प्रशांत दोडके प्रशांत मांडवकर दीपक घोडमारे संतोष शिरकुरे बबन जांभुडे वृषाली झुंगरे आदि उपस्थित होते