उपसंपादक/अशोक खंडारे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १५ /१०/२०२२ ला करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजाच्या हितासाठी नेहमी झटत राहनारे असे व्यक्तिमत्व असलेले रोहिदास राऊत यांच्या प्रती पक्षाच्या नेत्यांना आस्था असल्याने त्यांच्या वाढदिवसी राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा इच्छूक रक्तदात्यांनी सकाळी ११.०० वाजता पक्षाचे कार्यालय चांदेकर भवन चोमोर्शी रोड गडचिरोली येथे उपस्थित रहावे व सहकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक खंडारे यांनी केले आहे.