ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज _ स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, डॉ. अनिल थूल यांच्या अध्यक्षतेखाली भ.बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. महाविद्यालया मध्ये सामुहिक बुद्ध वंदना, पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. डी. टी. गजभिये, प्रा. राजेंद्र वालदे, प्रा. अनिल बनपूरकर, प्रा. दीपक भागडकर, प्रा. डॉ. संजय बाळ बुद्धे, प्रा. डॉ. शोभा भुरभुरे, श्री. डी. बी. बुद्धे, कैलास बळवाईक, श्री. ज्ञानेश्वर टेंभुर्णे संजय रामटेके, मीना चंहादे, प्रभा मेश्राम, हरीण खेडे, परमानंद बांगडे, राहूल रडके, राजू सोनकुसरे, जेट्टू नागोसे, अविनाश रामटेके, आदी प्राध्यापक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.