ऋषी सहारे

संपादक

 

ब्रम्हपुरी:–गांगलवाडी परिसरातील अनेक गावातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ब्रम्हपुरी व ईतर ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु त्यांच्या करिता असलेली शालेय बस सायंकाळी वेळेवर येत नसल्या कारणाने विद्यार्थ्यांना रात्रौ उशिर होत आहे आणि हा परिसर जंगल व्याप्त असून वाघांच्या हल्यात अनेक लोकांचे बळी गेले आहेत तेव्हा याची दखल घेऊन शालेय विद्यार्थ्यानं करिता असलेली सायंकाळची बसफेरी नियमित वेळेवर सोडा या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी परिवहन महामंडळ चे आगार प्रमुख मा.भाग्यश्री कोडाप यांना देऊन चर्चा करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार गांगलवाडी परिसरातील मौझा बरडकिन्ही,गोगाव,विकास नगर, तळो धी खुर्द,मुई, बेलपातळी, आवळगाव, वांद्रा,हळदा,बोडधा, कुडे सावली, मुडझा व गांगलवाडी येथून जवळ जवळ सकाळ व दुपार पाळी मिळून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बस ने ये जा करतात.

विशेष म्हणजे दुपार पाळी च्या विद्यार्थ्यांना 5:15 ला शाळा सुटल्या नंतर सायंकाळी 5.30 ते 5.45 दरम्यान सुटणारी मार्गे ब्रम्हपुरी, रुई, गांगलवाडी या एस. टी.बसचे नियोजित वेळ नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ बस स्थानकावर ताटकळत काढावा लागतो .बस वेळेवर येत नाही या कारणाने अनेक विद्यार्थी आपले शेवटचे पिरियड सोडून मिळेल त्या बसणे गावाकडे येत आहेत तर पूर्णपणे पिरियड करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी रात्रौ 7.30 ते 8 नंतर घरी यावे लागते या कारणाने विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणानावर वाईट परिणाम होत आहे तसेच शिक्षकांनी दिलेले होमवर्क व ईतर कार्य करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया पालक वर्गा कडून उमटत आहेत.

तेव्हा सायंकाळी 5.30 च्या दरम्यान सुटणारी बस नियमित वेळेवर सोडण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे याची दखल घेतल्या जाईल असे आश्वसन कोडाप मॅडम यांनी दिले आहे.

निवेदन देताना भकप नेते कॉ विनोद झोडगे,विनोद पाटील,प्रकाश चौधरी,संजय नागापुरे, होमराज पगाडे यासह अन्य पालक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com