गडचिरोली,(जिमाका)दि.14: मा.सचिव राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.04 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीं तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेपल्ली, वट्रा खुर्द स. व किष्टापुर दौड, इत्यादी ग्रामपंचायतीच्या समाविष्ट असून मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीचे टप्पे दिनांक:- प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 ऑक्टेांबर 2022 (गुरुवार), हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक दिनांक 13 ऑक्टेांबर 2022 ते दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 पर्यंत, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे, दिनांक 21 ऑक्टोंबर 2022, ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय मतदार यादीवर संबंधित ग्रामपंचायतीचे मतदार नागरिकांकडून हरकती व आक्षेप असल्यास विहीत कालावधीत या कार्यालयीन वेळेत दाखल करण्यात यावे असे तालुका निवडणूक अधिकारी,तथा तहसिलदार,अहेरी यांनी कळविले आहे.