नीरा नरसिंहपूर, ता. 14- सर्वधर्मसमभावाचे प्रतिक गाजी ए – मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. ) तिर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) यांचा 29 वा उर्स शरीफ सोमवार 17 आक्टोंबर ते बुधवार 19 आक्टोंबर 2022 दरम्यान होणार आहे. यानिमीत्त राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना जियारतला गोड जर्दा व दाळभाताचा महाप्रसादाचे वाटप करण्यात येतो. यानिमीत्त दर्गाहवरती सुंदर, मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचे दर्गाह व ऊरुस कमिटीच्यावतीने सांगण्यात आले. 

     तिर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील गाजी – ए – मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा ( रहे. ) यांच्या ऊरुसास हजरत सुफी वली चाँद पाशा ( आवाटी ), हजरत सुफी अरीफबाबा ( मोमिनाबाद ), हजरत यादअली साहब ( छोटे बाबजी राजस्थान) यांच्या जेरे – ए निगरानी ( मार्गदर्शनाखाली ) संपन्न होणार आहे. सोमवार 17 आक्टोंबरला सांगली व सोलापूर जिल्ह्यासह काझीगल्ली (अकलूज) येथून चार वाजता संदल मिरवणूकीने बाबांच्या मजार शरीफवर चढवून प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार 18 रोजी मुख्य ऊरुसा दिवशी संध्याकाळी 7 वाजता प्रसिध्द कव्वाल आज तकदीर सवारने दो फेम हाजी आझीम नाझा ( मुंबई ) व टिव्ही स्टार बशीर सासरी ( कर्नाटक ) यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे. तसेच बुधवार सकाळी 8 वाजता जियारतचा गोड जर्दाचे वाटप करून ऊरूस संपन्न होणार आहे. 

     ऊरुस निमीत्त आलेल्या लाखो भाविकांना दाळभाताचे लंगरखाना ( महाप्रसाद ) वाटप दुपारी 4 वाजलेपासून हजरत फत्तेह मोहम्मद जोधपूरी बाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीच्यावतीने देण्यात येणार आहे.

उरूसनिमीत्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तर उरूसनिमीत्त भाविकांना इंदापूर व अकलूज आजाराने एस.टी. बसची सोय करण्याची मागणी नागरिकांनी व भाविकांनी केली आहे. तर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाविकांनी केली आहे.

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com