उपसंपादक/अशोक खंडारे

 

वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसरातून जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून गरजूंना त्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजकुमार मुसने यांच्या नेतृत्वात लोहारा या आडवळणाच्या दुर्गम गावात पुस्तके, कपडे, ब्लॅंकेट, स्वेटर व अन्य वस्तूंचे वितरण करण्यात आले .स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके ही देण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध गावातील प्रतिष्ठित लोकांकडून संकलित केलेल्या वस्तूंचे वितरण करून गरजूंना दिलासा दिला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती बोबाटे, डॉ.गणेश खुणे, प्रा. रवी गजभिये, प्रा.शाम कोरडे, डॉ.भारत पांडे, प्रा.रवी शास्त्रकार ,आचल, पायल, वृषाली ,सावली ,शीतल, प्राची, मीनाक्षी ,सुरज, प्रीतम, निखिल, मोहन, स्नेहा, पायल तथा अन्य राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. गावातील माजी सरपंच विलास गावडे व आशा वर्कर यांनी सहकार्य केले. गावातील गरजूंनी विविध उपयोगी वस्तूंचा लाभ घेतला.या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News