चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

लाखनी:-

 

    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब मागील 17 वर्षापासून सातत्याने अभिनव व आगळेवेगळे उपक्रमाचे आयोजन अखंडपणे करीत असून सर्वच सण पर्यावरणस्नेही कसे साजरे करावे याचा आदर्श विद्यार्थी- नागरिकांना देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असतो. याच उपक्रमांतर्गत ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे दरवर्षी आगळीवेगळी अभिनव अशा ‘पर्यावरणस्नेही खगोलदर्शन कोजागिरीचे’ विहंगम चांदण्या रात्री व चंद्रप्रकाशात आयोजित करून रात्रीच्या आकाशाचे विहंगम वैभव टेलिस्कोप व दुर्बिणीच्या साहाय्याने वैज्ञानिक पार्श्वभूमीवर सर्वाना समजावून दिले जाते व विद्यार्थी -नागरिकांत खगोलप्रेम वाढवून ग्रह, तारे, नक्षत्र,रास,ग्रहणे इत्यादीबद्दल असलेले अंधश्रध्दा दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला जातो. यावर्षी सुद्धा अशा अभिनव कोजागिरीचे आयोजन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, गुरुकुल आय. टी. आय. तसेच आदर्शनगर महिलामंडळ,सिद्धिविनायक हॉस्पिटल यांचे सयुंक्त विद्यमाने गुरुकुल च्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.

   या कार्यक्रमात सिद्धिविनायक हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनोज आगलावे व डॉ. मीरा आगलावे, सामाजिक कार्यकर्ता अशोक हजारे,नगरसेविका विभा हजारे, गुरुकुलचे प्राचार्य खुशालचंद मेश्राम, ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास (नेफडो जि. भंडारा),मानव सेवा मंडळ नेचर पार्क बसस्थानक लाखनी यांचे सहकार्य लाभले.

   लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सर्वप्रथम खगोलचार्टच्या साहाय्याने 27 नक्षत्रे, 12 रास,8 ग्रह हे कसे अवकाशात ओळखावे याचे तंत्र चार्टद्वारे शिकविले त्याचबरोबर शनी,मंगळ ग्रह, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण, विविध नक्षत्रे, काही राशी याबद्दल असलेल्या अंधश्रद्धा गैरसमज,पूर्वापार चालीरीती यावर उपस्थित महिला, युवक तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रकाश टाकून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे कार्य त्यांनी केले.त्यानंतर काही काळ दिसलेला चंद्र ,त्यातील विवरे,सावली,त्यांची इंग्रजी नावे व गुरू ग्रह ,भारताचे चंद्रयान व मंगळयान मोहीम,सणानुसार रात्रीच्या आकाशात रास कशी ओळखावी याबद्दल विस्तृतपणे माहीती दिली. त्यात चंद्राचे 12 भाग ,गुरुचे उपग्रह हे दुर्बिणीद्वारे दाखविण्यात आले.काही काळ उघडा असलेला रात्रीचा आकाश लवकरच ढगाने झाकला गेल्याने टेलिस्कोपद्वारा चंद्रदर्शन न करता आल्याने अनेकांची हिरमोड झाली. दिवाळीच्या दिवशी असलेले खंडग्रास ग्रहणाची माहिती देऊन कोणत्याही चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही असे ठासून सांगितले.या खगोलदर्शन कोजागिरीच्या माध्यमातून कार्यक्रमाद्वारे ग्रीनफ्रेंड्सने अत्यंत अद्भुत,अभिनव व जिज्ञासू माहिती सादर केल्याने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.एकप्रकारे खगोलातील ‘तारे जमीन पर ‘आणण्याचे कार्य त्यांनी केले गेले व प्रत्येक सण पर्यावरणस्नेही कसा साजरा करावा याचा आदर्श नेचर क्लबने उपस्थित असलेल्या 70 पेक्षा जास्त महिला, विद्यार्थी,नागरिकासमोर ठेवला.यानंतर सामाजिक कार्यकर्ता अशोक हजारे यांनी खगोलदर्शन कोजागिरीच्या अभिनव कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे व डॉ मीरा आगलावे 

 यांनी उपस्थित महिलांना स्त्रीआरोग्यविषयक मोफत उपचार शासकीय योजनेद्वारे कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले व आगळ्यावेगळ्या कोजागिरीत आम्हा सर्वांना सुंदर ज्ञानवर्धक माहिती कोजागिरीनिमित्त मिळाली असा अभिप्राय त्यांनी दिला.यानंतर ग्रीनफ्रेंड्सचे सर्पमित्र- निसर्गमित्र पंकज भिवगडे,मयुर गायधने, गगन पाल, सलाम बेग,धनंजय कापगते, ,नितीन निर्वाण तसेच योगेश वंजारी यांनी नुकतेच पकडून आणलेले साप दाखविले.निसर्गसंशोधक विवेक बावनकुळे याने दुर्मिळ प्रजातीचा ऑलिव्हस किल बॅक साप व छोटे विंचू दाखवून नागरिकांची सापांविषयी असलेले गैरसमज ,अंधश्रद्धा, भीती व अज्ञान दूर करण्यात आले.अशाप्रकारे सर्व उपस्थितांना निसर्गातील प्रत्येक सजीव घटकांचे कसे महत्व आहे याचा संदेश या पर्यावरणस्नेही कोजागिरी निमित्ताने देण्यात आला.या अभिनव अशा पर्यावरणस्नेही खगोलदर्शन कोजागिरीला गुरूकुल आय. टि. आय.चे प्राचार्य खुशालचंद मेश्राम, कोषाध्यक्ष जयश्री मेश्राम मॅडम,वर्षा वंजारी मॅडम,रिटायर्ड मेजर ऋषि वंजारी,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सभासद व ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर, रामकृष्ण गिर्हेपुंजे,शिवलाल निखाडे,अशोक नंदेश्वर,ओंकार चाचेरे, पंकज देशमुख,लोकेश चन्ने,चेतन निर्वाण, ज्योती वैद्य, प्रा.अर्चना गायधने इत्यादी तसेच गुरुकुल आय. टी. आय. चा शिक्षक व कर्मचारी वर्ग ,आदर्शनगर महिला मंडळ,मानव सेवा मंडळ नेचर पार्क बसस्थानक लाखनी,सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी इत्यादींनी अथक प्रयत्न केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com