अनिलकुमार एन.ठवरे

ग्रामिण तालुका प्रतिनिधी आरमोरी

  देलनवाडी :- मोजा देलनवाडी येथे दि.०७/१० २०२२ ते दि.१४/१०/२०२२ या कालावधीत धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय व्यवस्था सुरळीत चालावी व व सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला ‘संविधान’ दिले.पण आपण त्याबद्दल तेवढे जागृत नाही,ही जागृतता व महत्त्व आबाल-वृद्धामध्ये निर्माण व्हावा या दृष्टीने नवोदय विद्यालय घोट येथे नवव्या वर्गात शिकण्याऱ्या कु.हंसिका वाल्मिक नन्नावरे हिने बौद्ध समाज देलनवाडी यांना ‘संविधान’ भेट दिला.या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    विशेष म्हणजे ती कबड्डी या खेळात राज्य स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.या करिता दखल न्यूज भारतचे ग्रामिण तालुका प्रतिनिधी अनिलकुमार एन.ठवरे यांनी तीचे अभिनंदन केले व तीच्या उज्वल भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी समाज अध्यक्ष किशोर भैसारे,सचिव लिलाधार टेम्भुरने, महिला अध्यक्षा कवंदा टेम्भुरने, वैशाली भैसारे,कोषाध्यक्षा सारिका साखरे,ग्रा.पं. सदस्य मनोज अंबादे,वाल्मिक नन्नावरे, गेमराज गेडाम व संपूर्ण बौद्ध समाज उपस्थित होता.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News