कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

पारशिवनी – कन्हान परिसरात मागील अनेक दिवसान पासुन कोल माफिया सक्रिय होऊन विविध ठिकाणी अवैध कोळस्याचे टाल लावुन चोरीचा कोळसा बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा. विजयकुमार मगर यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध कोळस्या वर आडा घाल्याकरिता कोळसा चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ६ महिन्या करिता जिल्ह्यातुन हद्दपार करुन ही कारवाई केली आहे .

 

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मागील अनेक दिवसान पासुन अवैध कोळसा , रेती , दारु , जुआ , सट्टा , नशिले पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे . स्थानिक गुन्हे शाखेच्या व कन्हान पोलीसांनी यावर अंकुश लावण्याकरिता कारवाई केली. परंतु आज ही परिसरात अवैध धंधे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरु आहे .

 

परिसरात मागील अनेक दिवसान पासुन अवैध कोळसा मोठ्या प्रमाणात विक्री करुन गुन्हेगारी प्रवृत्तीने दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख १) उमेश मारोतराव पानतावणे वय ४९ वर्ष , २) बालचंद्र हरीराम बिलोने ३) कुंदन ओमप्रकाश तिजारे वय ३२ वर्ष ४) बादल अशोक चवरे वय ३० वर्ष ५) आकाश अशोक चवरे वय ३० वर्ष सर्व रा.कांद्री कन्हान हे टोळीने एकत्र येऊन कन्हान परिसरातील गोंडेगांव कोळसा खदानीतील अवैधरीत्या कोळस्याची चोरी करून त्याची विक्री करीत होते. या प्रकरणी सदर चे आरोपीतांवर पो.स्टे , कन्हान येथे कोळसा चोरीचे सबंधाने एकूण १४ गुन्हे नोंद असल्याचे निर्देशनास आले आहे . आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या मना मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे जिवीतास व शासकीय मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे . सदर आरोपीतांचे कृत्ये लक्षात घेता त्यांचे गुन्हेगारी कृत्याला आळा बसविण्याकरीता सराईत गुन्हेगारांचे टोळी विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करून नागपुर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विजयकुमार मगर यांनी मंगळवार दि.१० आॅक्टोंबर २०२२ रोजी आरोपीतांना नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीण हद्दीतुन ६ महिन्याकरीता अप्रैल २०२३ प्रर्यत हद्दपारीची कारवाई केलेली आहे. 

 

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक मा. ओमप्रकाश कोकाटे , प्रतिबंधक सेलचे पोउपनि मा.भारत थिटे, पोलीस हवालदार मा.सुनिल डोंगरे यांनी केली आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com