सैय्यद जाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
हिंगणघाट :- दी, 12 ऑक्टोबर ईरानी टोळीतील विदेशी नागरिका कडून हिंगणघाट पोलिसांनी अनेक गुन्हाचा छडा लावला असून या कुख्यात गुन्हेगारा कडून तब्बल 9 लाख 54 हजार 133 रुप्याचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
देशभरात अनेक राज्यातील ऐकून 10 ठिकाणी गुन्हे केले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दी.6 आक्टोंबर रोजी धोत्रा येथुंन उपरोक्त हिंगणघाट कड़े एक सिल्वर रंगाची सिफ्ट डिज़ायर कार क्र.के.ऐ.-02-ऐम के -0744 येत असल्याची माहिती मिळाल्याने हिंगणघाट पोलिसांनी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर महाकाली नगरी वेना नदी कडून शहराकडे येनाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी करीत असता सदर कर ही भरधाव वेगाने येतांना पोलिसांनी अड्विली..
पुलिस पथकाने सम्पूर्ण रस्ता बेरिकेट्स लाऊं न बंद करीत कारला थाबवन्याचा प्रत्यंन केला सदर कारच्या गुन्हेगाराने त्याच्या ताब्यातिल गाड़ी थाबवून पळून जाण्याचा बेतात असलेल्यांनी एका पुलिस कर्मचाऱ्यास जीवे मारन्याच्या पर्यत करीत गम्भीर जख्मी केले..
पुलिस कर्मचाऱ्यांचे वाहनाचे सुद्धा नुकसान केले.दरम्यान कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी पोहवा शेखर डोंगरे, नितिन राजपूत, नापोशी नीलेश तेलरान्धे,अज़हर खान,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले,सचिन भारशंकर यांनी या ईरानी गुन्हेगाराची ब्यारिकेड्स च्या मदतीने अड़कुन केली व मोठ्या सिताफिने अरोपिला ताब्यात घेतले.
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुण त्याच्या ताब्यातून बनावट नंबर प्लेटची सिवफ्ट डिज़ायर कार व विदेशी चलनाच्या नोटा, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स महागड यावस्तु असा ऐकून 9 लाख 54 हजार 133 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला..
हिंगणघाट न्यायालयाने सदर आरोपी पुलिस कोठड़ी मंजूर केली..पोलिसांनी केलेल्या तपासात सदर आरोपी हा ईरान देशातील नागरिक असून त्याने भारतात मध्य प्रदेश ,कर्नाटक ,तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी ,पुणे, चिमूर,वरोरा,वर्धा अशा विविध ठिकाणी हात चलाखीचे गुन्हे केल्याचे सीसीटीव्ही फुटेज द्ववारे माहिती प्राप्त झाली आहे।
इतर ठिकाणी केलेले आणखी गुन्हे उघड येण्याची पुन्हा दाट शक्यता आहे। सदरची कार्यवाही प्रशांत होड़कर पुलिस अधीक्षक ,यशवंत सोड़के अप्पर पुलिस अधिक्षक ,दिनेश कदम उपविभागीय पुलिस अधिकारी , पुलिस निरीक्षक कैलाश पुंडकर यांचे मार्गदर्शना खाली पुलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर ,डी. बी.पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नापोशी नीलेश तेलरान्धे, सचिन घेवनदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर ,वाहतूक शाखाचे पोहवा नितिन राजपूत, नापोशी अज़हर खान , व पोहवा जगदीश चौहान यांनी केली.