गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत केवळ कूटनितीचे राजकारण…… — त्यात आम्ही भारतीय जनता कुठे? — माध्यमानीच आम्हाला गुलाम बनविले…? — भाग — 3 ….

          “माध्यमानीच आम्हाला गुलाम बनविले…..

         चित्रपटसृष्टी,साहित्यिक ( कवी, लेखक, कादंबरीकार, ), प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया,नाटके,गायक,अर्थतज्ज्ञ,इत्यादी समाज शास्त्रज्ञ,इत्यादी समाज माध्यमे.

         यांनी आजपर्यंत समाजाचा आरसा म्हणूनच भूमिका बजावलेली आहे. परंतू,लोकशाहीला यांची ही भूमिका कधीच मान्य नव्हती व नाही…

         कारण ही सर्व माध्यमे लोकशाहीत यासाठी निर्माण केल्या गेली,की समाजातील ( जाती धर्माच्या,राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत ) शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुता ही नैसर्गिक न्यायावर आधारलेली लोकशाही मूल्ये खोलवर रुजविण्यासाठीच यांची निर्मिती झालेली असते.त्यासाठी लोकशाहीचे तीन स्तंभ कायदेमंडळ (कोणत्याही सभागृहाचे सदस्य),कार्यकारी मंडळ ( कोणतेही सरकार ), न्यायमंडळ (प्रशासकीय न्यायाधीकरणे आणि असलेली स्वतंत्र न्यायपालिका) यांना घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याची ( Constitutional and moral duties ) वेळोवेळी जाणीव करून देण्याचे ( ते जर भटकत असतील तर ) घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे या माध्यमाचे होते,आहे आणि राहील ..

           परंतू,गेल्या 60 वर्षात ही माध्यमे आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यातून किती प्रमाणात जागृत होते व आहेत याचा लेखा जोखा तपासला असता,असे लक्षात येते की यांनी इतर लोकशाहीवादी देशाच्या तुलनेत फार काही मजल मारलेली दिसत नाही.कांही बोटावर मोजण्याइतके लेखक व पत्रकार जर सोडले तर इतरांना आपली निर्मिती लोकशाहीत कशासाठी झाली हेच माहित नाही…

         आणि आजची पत्रकारिता म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गुलामच आहेत असं म्हणण्यापेक्षा सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांनी आणि भांडवलदारानीच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्वतःच निर्मिती केल्यामुळे त्यागी व संघर्षी पत्रकार यांना यू ट्युब चॅनल या समाज माध्यमाचा आश्रय घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत…

             परंतू 99•99% पत्रकारिता ही आज 2024 च्या काळात षंढ,नेभळट आणि नपूंसक झालेली आहे.केवळ भ्रष्ट सनदी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करून आणि नीतीभ्रष्ट राजकीय नेत्यांच्या व राजकीय पक्षांच्या उपकारावर जगत आहे…

             राजकारणातील नेत्यांच्या माकडी कोलान्टउड्या, त्यांचे अस्थिर कॉमेंट्स ज्यांच्यामुळे गुलामी जनतेचं मनोरंजन होईल आणि कितीही महागाई व बेरोजगारीच्या झळा लागल्या तरी त्यांनी हुं की चू न करू देण्यासाठीच जणूकाही यांची निर्मिती झालेली आहे.

         त्याचप्रमाणे पोटात भुकेचा आगडोंब जरी असला,तरी टी. व्ही.वरील मालिका,यू ट्युब वरील व्हिडीओ,चित्रपटातील दृश्य पाहुन,मनोरंजक बातम्या पाहुन ऐकून,भुकेला विसरणे,त्यासाठी प्रसंगी मादक पदार्थांचा वापर करण्यासाठी सुद्धा मागेपुढे न पाहणे…

          अशी समाजाची मानसिकता निर्माण करणारी माध्यमे आज 2024च्या काळात निर्माण झालेली आहेत.

        समाजाने सत्य – असत्य, कुशल – अकुशल,चांगले – वाईट,खरे – खोटे यांची पारख करून सदविचारी बनू न देण्यासाठीच या माध्यमाची निर्मिती झालेली आहे.असा आभास येथील व्यवस्थेकडून निर्माण करण्यात आला आहे…

         आणि या व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी येथील माध्यमे रात्रंदिवस झटत आहेत.

          म्हणून आम्ही ( भारतीय जनता ) गुलाम असून गुलामीची जाणीव होत नाही..

“गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. “

 — डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

      वरील महामानवाचा आदेश प्रयोगातून कसा यशस्वी सिद्ध करावा हाच मुळी प्रश्न आहे?

मी माझ्यापरीने प्रयत्न करत आहे……..

   आपणही …..

       जागृतीचा लेखक

        अनंत केरबाजी भवरे

  संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर,7875452689..