पुनम खोब्रागडे
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही :- स्थानिक सिंदेवाही शहरातील नंदकिशोर खोब्रागडे हे,तालुक्यातील सरडपार आणि विरवा या गावात कोतवाल पदावर कार्यरत होते.
ते आपल्या कुटुंबीयांसह सिंदेवाही येथील मदनापुर वार्ड येथे राहात होते.अचानक नंदकिशोर हे सिंदेवाही येथून बाहेर गावी आपल्या वैयक्तिक कामानिमित्त दोन दिवसापूर्वी गेले असता त्यांनी दुसऱ्या दिवशी येताना रात्री घरी फोन केला की मी बाहेरून हॉटेल मधून जेवण करून येतो.
परंतु नंदकिशोर हे रात्री घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय मंडळी ही त्यांच्या प्रतीक्षेतच होती.यासंबंधी त्यांच्या कुटुंबातील संजय हिरामण खोब्रागडे यांनी सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार केली.
परंतु नंदकिशोर यांचे घरी परत न येण्याचे कारण अद्याप उघडकीस येणे उर्वरित आहे.सदर घटनेचा तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सिंदेवाही पोलिस करीत आहे.