दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आतिष शिरभाते यांची निवड… — काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात सत्कार समारंभ संपन्न…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आतिष बबनराव शिरभाते याची निवड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस बबलू देशमुख व दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे प्रमाणपत्र देऊन अध्यक्षपदी आतिष शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली.

            राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव आतिष शिरभाते यांना असून या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदाची त्यांनी धुरा यशस्वीरिता सांभाळली होती त्याचबरोबर दर्यापूर तालुका तेली समाजाचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. शहरासह तालुक्यात त्यांनी स्वतःचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले काँग्रेस त्रिमूर्ती यांनी अतिष शिरभाते यांच्यावर विश्वास संपादित करत एक शहराची नविन जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली त्या अनुषंगाने आज 14 सप्टेंबरला दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी मध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या वतीने आज कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

           आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची घडामोड शहरात झाली असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आतिष शिरभाते यांना अध्यक्ष पदाचं प्रमाणपत्र देतेवेळी त्यांनी पक्षाच्या वतीने दिलेली जबाबदारी यथायोग्यतेने पूर्ण करेल त्याचबरोबर नियोजन बद्ध व पक्षाच्या हिताचे ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे व्यक्त केले नियुक्ती पत्र देते वेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आमदार बळवंत वानखडे याच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले तर दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कार्यालयात तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

          नवनियुक्त शहराध्यक्ष यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सुधाकर पाटील भारसाकळे सुनील गावंडे ईश्वर बुंदिले बबनराव देशमुख प्रभाकर तराळ दिलीप गावंडे नितेश वानखडे दिलीप चव्हाण सय्यद रफिक अँड निशिकांत पाखरे असलम मंसूरी जम्मुभाई पठाण सय्यद नदिम मनोज बोरेकर मधु घाडगे दत्ता कुंभारकर सुभाष गावंडे दीपक मालखेडे सुरेंद्र सिंग ठाकूर असल घाणीवाले अज्जू पठाण रामेश्वर तांडेकर आसिफ खान गुड्डू कुरेशी प्रकाश चव्हाण गजानन देशमुख शेख वसीम अँड मुकुंद नळकांडे प्रतीक बोचे आदिल घाणीवाले नितीन गावंडे विनोद वानखडे शरद ठाकरे धनराज बुंदेले नंदू गावंडे इरफान इनामदार विनोद श्रीवास चंद्रशेखर घाडगे संजय वसू मुन्ना पहिलवान सत्यपाल इंगळे मनोज तायडे विकास राणे रवी ब्रदिया सलीम शहा राजू भांडे असिफ भाई सह काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.