नवीन बांधण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती या वस्तूचा श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या कीर्तन सेवेने वास्तुशांती समारंभ संपन्न.

 

निरा नरसिंहपुर दिनांक 14

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

        पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील महावितरणचे अधिकारी ,राहुल बापूसाहेब शिंदे परिवाराने नूतन बांधण्यात आलेले स्वप्नपूर्ती या वास्तूचे पुजन व उद्घाटन श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज मळवलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. महापूजा नंतर सायंकाळी आठ ते दहा या वेळेत श्री गुरु बापूसाहेब देहुकर यांची कीर्तन सेवा सांगण्यात आली.

          धार्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व बापू यशवंत शिंदे यांच्या परिवाराच्या वतीने बांधण्यात आलेले स्वप्नपूर्ती वास्तूचा आज वास्तुशांती समारंभ भजन व कीर्तन रुपी सेवेने संपन्न झाला. आलेल्या सर्व ग्रामस्थ व भाविकांनी यावेळी महा भोजनाचाही आस्वाद घेण्यात आला.

          किर्तन सेवे प्रसंगी श्रीगुरु बापूसाहेब देहुकर महाराज सांगत आसताना म्हणाले की किर्तन रुपी सेवेप्रमाणे घेतलेला हा नामाचा रस हाच अमृता समान आहे याच्यापेक्षा गोडी कोणत्याही रसात नाही. आई-वडिलांची सेवा हीच दैवता समान आसल्याचेही यावेळी बापूसाहेब देहुकर महाराज सांगत होते.

            या कार्यक्रमासाठी निरा नरसिंहपुर टणु, ओझरे, गोंदी, गारअकोले,टाकळी, बिजवडी, पिंपरी बुद्रुक, संगम,या सर्व परिसरातील भजनी मंडळ, वारकरी, टाळकरी, विणेकरी, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.