कमलसिंह यादव

कन्हान व नागपूर ग्रामीण प्रतिनिधी..

 

कन्हान : – नागपुर वरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी घरी परत जाणा-या कल्पेश बावनकुळेची अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे हत्या केल्याने कन्हान शहर व ग्रामिण भागात भयंकर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     हत्या करण्या-या आरोपींना ४८ तासाच्या आत अटक करून जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडावे,४८ तासात खूण करणारे आरोपी गजाआड केले गेले नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यांनी नागपूर पोलिस प्रशासनाला दिला आहे.

        कन्हान व ग्रामिण भागात रात्रीला नियमित पोलीस गस्त सुरू करावी व नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकीला तात्काळ मान्यता द्यावी.याचबरोबल चारपदरी रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावण्यात यावे,असे सुचक विधान सुध्दा त्यांनी केले आहे.

         रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राअन्वये शिवसेना पक्षातंर्गत लोकसभेचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात शिवसेना रामटेक विधानसभा व संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा प्रदेश उपाध्यक्ष महेन्द्र भुरे यांच्या समवेत शिष्टमंडळा व्दारे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना आज तसे निवेदन दिले व घटनाक्रमा संबंधाने सविस्तर चर्चा केली.   

          १० सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्री कल्पेश भगवान बावनकुळे,रा.बनपुरी यांची काही अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे निर्घृण हत्या केली.मात्र आज चौथा दिवस उजाळुन ८५ तास झाले तरी हत्याच्या आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासनाला अद्याप यश न आल्याने बनपुरी, कांद्री- कन्हान व ग्रामिण परिसरात चांगलेच भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

     तेली समाजात आणि परिसरातील नागरिकात,पोलीस प्रशासना विरूध्द रोष निर्माण होत आहे.कल्पेशच्या हत्या-यांना लवकरात लवकर शोध करून अटक करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी कामठी यांनी दिले. 

     शिष्टमंडळात शिवसेनेचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव,रामटेक विधानसभा प्रमुख प्रेम रोडेकर,दिलीप राईकवार,कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावने,रूपेश सातपुते,पुरुषोत्तम येनेकर, गोविंद जुनघरे,नरेंद्र खडसे, प्रविण गोडे,अनिल ठाकरे,लल्लण कुशवाह,मनोज मेश्राम,बल्ला यादव,विजय बोरकर,संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश भोंदे,रवि घावडे,विजय बावनकुळे,सुरेश पारधी,प्रभाकर सावरकर,नंदु घावडे,प्रमोद देशमुख,शुभम घावडे,विठ्ठल बावनकुळे,दिलिप देशमुख,मोहन धांडे,अनिल बारई,आशिष बावनकुळे,नितिन लेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News