कन्हान : – टेकाडी येथे भव्य रोग निदान, रक्तदान व ऑनलाईन आधार कार्ड, पॅन कार्ड दुरूस्ती शिबीरात नागरिकांना सेवाभावी लाभ करित समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी चा ११ वा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. 

         समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्दे शीय संस्था टेकाडी गेल्या अनेक वर्षापासुन सामाजि क क्षेत्रात कार्यरत असुन विविध कार्यक्रम राबवुन जन जागृती करणे, शासन प्रशासनाचा योजना तळागळात ल्या नागरिका पर्यत पोचविण्याचे कार्य करीत आहे. त्यातच ११ सप्टेंबर २०२२ वा संस्थेचा ११ व्या वर्धाप न दिनानिमित्त टेकडी गावात भव्य रोग निदान, रक्तदा न शिबिर व ऑनलाइन आधार कार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती शिबीराच्या माध्यमाने परिसरातील रूग्णाना व नागरि काना सेवाभावी लाभ देण्यात आला. रोग निदान शि बीरात हृदयरोग, छाती संदर्भातील रोग, अस्थमा, दमा, टी. बी, पोटाचे रोग, पत्री, जलोदर, अपेंडिक्स, ब्लड प्रेशर, शुगर, स्त्री रोग, हर्निया, पंडिक्स, अपचन, लिव्हर , पिलिया आदी रोगा विषयी मार्गदर्शन, तपासणी व निशुल्क उपचार करण्यात आला. तसेच ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड, हेल्थ कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड अप डेट आणि दुरूस्ती ऑनलाइन शिबीरात करून परिस रातील नागरिकांना सेवाभावी लाभ देण्यात आला. या शिबीरात ३७ रक्तदात्याने रक्तदान केले तर ७५रुग्णांनी रोगानिदान शिबाराचा लाभ घेतला. महल्ले मल्टी स्पे शालिस्ट हॉस्पिटल चे डॉ. सुमेध रामटेके एमबीबीएस, एमडी (मेडीसीन), डॉ.पुजा मनवर एमबीबीएस, एम डी (स्कीन स्पेलीस्ट), डॉ. महेन्द्र गुजर (एमबीबीएस, एमएस), डॉ. राखी रा. महल्ले (बीएएमएस, सीजीओ ), डॉ. राहुल मा. महल्ले एमबीबीएस, एमडी (ए एम) इएमएस, सीसीएच, डॉ. महेक मेहता एमबीबीएस, एमएस (स्त्रिरोग तज्ञ) आदी डॉक्टरानी प्रामुख्याने उपस्थित राहुन सेवा प्रदान केली. ग्रा प टेकाडी (को ख) सरपंचा सुनीता मेश्राम, लीलाधर बर्वे, शरद डोणे कर, महेश काकडे, शालिनी बर्वे, दिनेश चिमोटे,अरूण सर्यवशी, रिकेश चवरे, मनोज होले, शैलेश शेळकी आ दी मान्यवरानी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले. शिबीराच्या यशस्विते करिता आयोजक संस्थेचे अध्यक्ष निलेश गाढवे, केतन भिवगडे, मोहन वकलकर , नितीन बुराडे, अभिजीत चांदुरकर, अनिकेत निमजे, श्याम मस्के, मनोज लेकुळवाळे, विक्की खडाळ, किशोर गाडगे, राजकुमार वजेकर, प्रविण चव्हाण आदीने परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News