अनू . जाती- जमातीच्या एकजुटीची ताकद,कर्नाटकाचे महाराष्ट्र बनवु शकता- अँड. राम मेश्राम

ऋषी सहारे

संपादक

 गडचिरोली – अनु. जाती -जमाती ‘ बहुजनांच्या एक जुटीची ताकद कर्नाटका प्रमाणे महाराष्ट्र बनवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तींमत्व कुनीही मान्य करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेले आणि म्हणाले मी बुद्धाच्या भुमीत जन्मलो. तेव्हा डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचे उपकार माझेवर आहेत. त्यांचामुळे मी आज पंतप्रधान पदावर आहे म्हणुनच आज देशाला युद्धाची नव्हे तर बुद्धाच्या शांतीच्या मार्गाची गरज आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी जि . प . सदस्य अँड. राम मेश्राम पोटेगांव येथील बुद्ध विहाराच्या भुमीपुजन पसंगी केले. भीमज्योती नवयुवक बहुउद्देशीय मंडळ ‘ पोटेगांव ( राजुली ) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे तथागत बुद्ध विहार भुमीपुजन कार्यक्रमचे अध्यक्ष माजी जि . प. सदस्य अँड. राम मेश्राम हे होते , तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते. बुद्ध विहार कोठरी परिसरातील पुज्य भन्ते यांच्या उपस्थितीत भुमीपुजनाचा विधिवत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी नेते विनोद मडावी , माजी प. स . सदस्य मालता मडावी , पोटेगांव च्या सरपंच अर्चना सुरपाम, मारदा चे सरपंच मनोहर पोटावी , राजोलीच्या सरपंच काता हलामी, देवापूर च्या सरपंच सविता पोटावी , सा. कार्यकर्ते दिलीप गोवर्धन , शिवाजी मडावी , देवारे सर, भोयर सर , कुलमेथे बाबु ‘ मंडळांचे अध्यक्ष डॉ. विजय रामटेके, मुजुमकर , फुलझेले आदि लाभले होते . प्रा मुनिश्चर बोरकर म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या परिश्रमाने घटना लिहुन भारताला राज्य घटना बहाल केली. संविधानानुसार देश चालला पाहीजे जो कोणी संविधानाला गालबोट लाविल ‘ संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्यांचा नायनाट झालाशिवाय राहणार नाही. याप्रसंगी विनोद मडावी, माजी प. स सदस्य मालता मडावी , शिवाजी मडावी , शिवाजी नरोटे यांनी क्रातीविर बिरसा मुंडा , डॉ. आबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय रामटेके , सुत्रसंचलन कुडवे सर तर आभार ज्ञानेश्वर मुजुमकर यांनी केले. कार्यक्रमास पोटेगांव परिसरातील आदिवासी व अनु .जातीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी अनेक समस्याचे निवेदन माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचेकडे दिले.