वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र अमरावती / वाशिम जिल्हा प्रशिक्षक तथा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे कारंजा संघटक आशिष धोंगडे यांचा जन्मदिवस कारंजा येथील गजानन महाराज मतिमंद निवास विद्यालय येथे अपंग मुकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील भटके मुक्त समाजातील युवक व युवतींना शैक्षणिक पुस्तक आणि फळे वाटप करण्यात आले.
अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अमरावती जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी युवकांना सामाजिक बांधिलकी ठेवून आपला जन्मदिवस साजरा करावा असे आव्हान या जन्मदिनानिमित्त करण्यात आले.
प्रत्येक युवक व युतीने आपला जन्मदिवस कुठल्याही सेलिब्रेशन न करता भटक्या मुक्त समाजातील युवकांसोबत आणि वृद्धाश्रम आश्रमामध्ये साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.या जन्मदिनानिमित्त उपस्थित म्हणून महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले तसेच कारंजा अध्यक्ष आरिफ भाई पोपटे यांची उपस्थिती होती.
कारंजा येथील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे तालुका कोषाध्यक्ष प्रा.सी.पी.शेकुवाले सवर्श्री कालुभाई तवांगड मोहम्मद मुन्नीवाले,उषाताई नाईक हाफीज शेख,सतीश भगत दामोदर जोधलेकर,रमेश देशमुख प्रतीक बाजड,आकाश भगत यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अशाप्रकारे हा जन्मदिवस साजरा करण्यात आला….
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत