चिमूर क्रांती शहीद स्मृती दिना निमित्त पोलीस अधिक्षकांनी केली शहरातील मुख्य रस्त्याची पाहणी…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-

        चिमूर शहीद स्मृती दिन सोहळा तथा माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन 16 ऑगस्ट शुक्रवार ला करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपा प्रदेश अध्यक्ष, ग्रामविकास पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री आदी मान्यवर चिमूर क्रांतीभूमी तिल शहीदांना अभिवादन करण्यासाठी येनार आहेत. त्या निमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी गुरुवारला शहरातील मुख्य रस्ते, हुतात्मा स्मारक, अभ्यंकर मैदान व बिपीएड ग्राऊड येथील सभा स्थळाची पाहणी केली. हा कार्यक्रम शांतता व सुव्यवस्थेत सुरळीत पार पाडण्याकरिता पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. 

        या कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत.

        कार्यक्रमाच्या सहा दिवसांपूर्वीच पंचशील चौक, चावडी चौक, जामा मस्जिद, बस स्थानकापुढे आणि जुन्या बस स्थानक येथे फिक्स पाँइट लावण्यात आले आहे. प्रत्येकी दोन कर्मचारी कर्तव्यावर ठेवले आहेत. कार्यक्रमादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह बॅनर व पोस्टर लावणाऱ्यावर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून आहेत.