दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर १४ ऑगस्ट – केंद्र आणि राज्य शासनाद्वारे ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम राज्य शासनाद्वारे राबविली जात आहे. या अभियानांतर्गत जनसामान्यांमध्ये देशभक्तीची भावना कायमस्वरुपी राहावी यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत असुन मोहिमेची जनजागृती व्हावी या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाला आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
मनपातर्फे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शाळा, महाविद्यालये, क्षेत्रिय कार्यालये याद्वारे साजरा करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत नागरीकांना ध्वज सहजतेने उपलब्ध व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आले असुन मनपा मुख्य इमारत, 3 झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ज्युबिली हायस्कूल अश्या 5 केंद्रांवर ध्वज वितरण सुरु आहे. 30 हजार ध्वजांचे वाटप आतापर्यंत शहरात करण्यात आले आहे.
तिरंगा ध्वज दुचाकी रॅली,सांस्कृतिक कार्यक्रम,स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या आप्तजनांना सत्कार व सन्मान, भव्य तिरंगा यात्रा, तिरंगा सेल्फी स्पर्धा असे विविध उपक्रम मनपातर्फे घेण्यात आले आहेत. शहरात शहरांमध्ये प्रभातफेरी, बॅनर, पोस्टर, हॅण्डबील, ध्वनीक्षेपक संयंत्र, संदेश व इतर प्रसार माध्यमांद्ववरे जनजागृती करण्यात येत असुन शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर ध्वज संहितेचे पालन करुन अभिमानाने तिरंगा उभारावा व हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले उपस्थीत होते.