गुणवंताच्या पाठीवर चव्हाण बंधूंची अविरत थाप… — ५१ विद्यार्थ्यांचा  सहृदय सत्कार संपन्न…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

नागभिड :- एक तपापासून परिसरातील गुणवंत विद्यार्थी सत्काराचे तप जोपासणाऱ्या चव्हान परिवाराने यंदाही ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार करून,रोख रकमा देऊन आपला वसा कायम ठेवला आहे.

         दि.१३ जुलै ला नवेगाव पांडव,मिंथूर परिसरातील गुणवंताना प्रेरित करून अरुण चव्हान व रतिराम चव्हान यांनी कुणाचीही आर्थिक मदत न घेता आपले काम नेटाने पुढे रेटले आहे. 

            नागभिड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील ने.हि.विदयालयात शिकलेल्या चव्हान बंधूनी शिक्षकी पेशा सांभाळला निवृत्त झालेत. बाहेर स्थाईक झालेत मात्र शिक्षणामूळे आपण घडलो ही जाणीव कायम ठेवून दरवर्षी मिंथुर येथे सहपरिवार येऊन १०वी ,१२ वीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी बांधवाच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन, प्रमाणपत्र,रोख देऊन क्षुणमुक्त होत.याचा अल्प का होईना प्रयत्न करित असतात.

               यंदा मिंथूर येथील समाज भवनात ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ आयोजित या गोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ट निवृत्त शिक्षक दिवाकर नवघडे हे होते.

          ऍड.शर्मिला रामटेके सरपंच नवेगाव पांडव, विशाखाताई डोंगरे सरपंच मिंथूर,श्रीमती शारदाबाई नवघडे, सौ.खोकले उपसरपंच मिंथूर,डॉ. दिशांत मेश्राम नागपूर,शांताताई गेडाम हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

      यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुंदर उपक्रमाचे प्रस्ताविक रातीरामजी चव्हाण यांनी तर आभारमत हिमांसू गेडाम यांनी व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे सुंदर संचालन प्रज्ञा चव्हाण हिने केले.