वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
रमेश देशमुख दि 16/7/22 कारंजा :- कारंजारील गॅस गोडाउन परिसरात एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला. याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधार सिंह सोनवणे साहेब व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव साहेब पो कॉ रोहन तयाडे पो कॉ अनील राठोड पो कॉ भारत राठोड पो कॉ एकनातं सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जाऊन पंचनामा केला. व त्यावेळी तो मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात कारंजा येथे आणण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक जाधव साहेब यांनी फोन द्वारे मातोश्री रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक विधाता चव्हाण यांना दिली.
नेहमी मदतीसाठी धावून जाणारे रुग्णसेवक विधाता चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पाऊस जोरात चालू होता चिखल ही खूप होता. पण कारंजा शहर उपनिरीक्षक जाधव साहेब व कर्मचारी व रुग्णसेवक विधाता भाऊ चव्हाण यांनी त्या बेवारस मृतदेहाला कारंजा ऊपजिल्हा रुग्णालयामध्ये पोचविला . व त्यावेळी त्याचे पोस्टमार्टम करून त्यां मृतदेहाला फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले. तीन दिवस उलटून सुद्धा कोणताही सुगावा न लागत आणि त्याची ओळख पटु न शकल्यामुळे शेवटी शहर पोलीस स्टेशन कारंजा व रुग्णवाहिका असोशियन कारंजा यांनी पुढाकार घेत त्या बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. आणि माणुसकीचे दर्शन घडवले. त्यावेळी श्री गुरूमंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख मातोश्री रुग्णवाहिकेची विधाता चव्हाण समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार अजय घोडेस्वार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुग्णसेवक विनोद खोंड वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके स्मृति रुग्णवाहिकेचे दिपक सोनोने108 रुग्णवाहिकेचे नरेंद्र बारसे कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पो कॉ रोहन तायडे पो कॉ फिरोज खान नगरपरिषद चे मुकेश डेडुळे चेतन डेडुळे सुनील नरवाले कन्हैया मेंढे व महाराज शिंदे महाराज त्यांनी त्या बेवारस मृतदेहाचा त्याचा अंत्यसंस्कार केला.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत