बल्लारपुर:चंद्रपुर वणी आर्णी लोकसभेचे खासदार सूरेश धानोरकर यांनी आज बल्लारपुर पीडब्लुडी गेस्ट हाऊस येथे बल्लारपुर शहरातील अधीकाऱ्यां सोबत पुरपरिस्थिती बाबत आढावा बैठक घेतली.तथा पूर परिस्थिची पाहणी केली.
बल्लारपुर राजुरा मार्ग बंद असल्याने पूर परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारची हानी होनार नाही व ज्या भागात लोकवस्तीत पुराचे पाणी येईल त्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे व त्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना यावेळी खासदार धानोरकरांनी अधिकार्यांना दिल्यात.या वेळी बल्लारपुर च्या एसडीएम मॅडम, तहसीलदार, नगर परिषद चे मुख्यधिकारी उपस्थित होते. तसेच काँग्रेस चे माजी गट नेते देवेंद्र आर्या माजी नगर सेवक भास्कर माकोडे छाया मडावी सूनंदाताई आत्राम मिना बहुरीया ईस्माइल ढाकवाला नरेश मुंदडा दौलत बूंदेल विनोद आत्राम मुक्कदर सय्यद सुयोग खोब्रागडे कासीम शेख व बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.