नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 

गुरुपौर्णिमा लेख:-

गुरूर ब्रम्हा,गुरूर विष्णू, गुरूर देवो महेश्वरा

गुरूर साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरूर नम:

गुरूंचे आपल्या भारतीय संस्कृती मध्ये खूप मोठे स्थान आहे.गुरूंना देवापेक्षा मोठा दर्जा दिलेला आपल्याला आढळतो.कारण बालपणी लहान बालक हे एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते.त्या बालमनावर योग्य ते संस्कार करून त्याला आकार देण्याचे काम गुरू करत असतो.त्यामुळे गुरूंचा प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण स्थान असते.गुरूकुल काळापासून आपल्या देशात गुरूशिष्य परंपरा चालत आलेला आहे.आता ती अस्तित्वात नसली तरी शिकविणाऱ्या शिक्षकांचे स्थान समाजात कमी झालेले नाही.

मी लहान असतांना माझ या धरतीवर पडणाऱ्या पहील्या पाऊलापासून मला मार्गदर्शन केल ती माझी आई.तिचे माझ्या आयुष्यात प्रथम गुरूचे स्थान आहे.आपण जन्म घेतल्यापासून आपली शाळा व आपले जिवनाचे शिक्षण आईच्या या न दिसणाऱ्या शाळेतच सुरू होते. आपल्या आयुष्याला चांगली जडणघडण लागावी यासाठी ती उत्तमोत्तम संस्कार आपल्यावर करत असते. आज मी समाजात मानाने वावरतो.माझ्या एकूण सर्व प्रगतीमध्ये माझ्या आईचाच हात आहे. तिने मला जस घडवल तस मी घडलो.

त्यामुळे “आई माझा पहिला गुरू,ती कल्पतरू” या ओळी मला अभिमाने सांगाव्याशा वाटतात.

 आजही मला आठवते मी लहान असतांना शाळेतून काहीही वस्तू आणली तर ती मला रागावत असे. तसेच ती वस्तू मला परत करावयास लावत असे.अशाच बऱ्याच गोष्टी व तिची शिकवण आजपर्यंत माझ्या मनावर कोरलेलु आहे. आज शिक्षणक्षेत्रात मी बरेच चांगले काम केले.आज माझ्या कामाची चारचौघात चर्चा होते.हे सर्व माझ्या आईच्या चांगल्या शिकवणीचे फलीत आहे.लाखो रूपये खर्च करून सुद्धा आपल्याला विकत घेता येत नाही ते म्हणजे उत्तम चारीत्र्य.हिच मोठी देगणी माझ्या आईने दिलेल्या उत्तम संस्काराने मी कमावलेली आहे.

मला आवर्जून माझा दुसरा गुरू माझे बाबा यांचा उल्लेख करावा लागेल. बालपणापासून आम्हाला त्यांच्या दवारे शिस्तीचे धडे मिळाले.जगात चांगल व वाईट काय असत हे शिकविणारी माझी पहीली शाळा माझ्या बाबांच्या आजूबाजूलाच असायची .त्यांच्या सहवासात व अनुभवातुन मी जगातील शाळेचे धडे घेतले.आज माझ्या अंगी जी शिस्त व नियमितता रूजली आहे.त्यात माझ्या बाबांचे मोठे योगदान आहे.माझ्या बाबांनी आम्हाला कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध करून दिलेली नाही. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी कष्ट करावे लागतात हि शिकवण त्यांनी आम्हाला बालपणीच बिंबवली.त्यामुळे स्वतःच्या कतृत्वावर आम्हाला बालवयापासूनच अनेक बाबी मिळवाव्या लागल्यात.आपण बाबाकडे नेहमी वेगळ्याच नजरेने पाहत असतो.परंतु आतून नारळासारखे मऊ असणारे बाबा प्रसंगी कठोर झाले तरी ते आपल्याच हितासाठी असत विसरायला नको.आपण शाळेपेक्षा जास्त कालावधी घरीच घालवत असते त्यामुळे आपल्या वर कळत नकळत बाबांचे संस्कार होत असतात. आपल्या वागणूकीतून व कार्यातून प्रत्येक वडील काहींना काही शिकवत असतातच.

माझा तिसरा गुरू म्हणून येथे मला प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा समावेश करावे लागेल.अंगणवाडी पासून आपल्या वर शिकवणीचा पाऊस पडतो.अंगणवाडी मध्ये शिकविणारी बाई आपले कलाकौशल्य पणास

 लावून आपल्याला घडवीत असते.आईसारखे प्रेम देवून ती आपल्याला विविध गोष्टी शिकवते. त्यामुळे आपल शिक्षणाच पुढच पाऊल सक्षम होत असते. नंतर आपल्या शैक्षणिक जिवनाचा मोठा प्रवास सुरू होतो.पहिल्या वर्गापासून आपल्याला आपले शिक्षक उत्तम शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करत असतात.त्यांच्या जवळ कोणताही भेदभाव नसतो.निस्सीम पणे ते आपले ज्ञानदानाचे कार्य चालू ठेवतात. प्राथमिक शाळेते जे शिक्षण मिळत असते ते जिवनभर पुरणारी शिदोरीच असते. ती कधीही सरत नाही. त्यामुळे या अवस्थेत चांगले शिक्षक मिळण्यासाठी एक प्रकारचे भाग्य लागते.त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.मला माझ्या आयुष्यात प्रत्येक स्तरावर उत्तम शिक्षक मिळाले. त्यामुळे शिक्षकाचे महत्त्व माझ्या आयुष्यात खूपच आहे.प्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक आज जरी आठवणीतून पुसट झाले असले तरी चिरकाल टिकणारी त्यांची शिकवण आजही माझ्यात अबाधित आहे.काही शिक्षकांची छाप आजही मनावर उमटलेली आहे.त्यात माझे प्राथमिक शिक्षक भंर्दीगे सर ,तसेच इंग्रजी शिकविणारे स्व.शेख सर,गणित शिकविणारे मोरे या त्रीविभुतीचा माझ्या प्राथमिक शिक्षणाचा पाय दर्जेदार होण्यामागे मोठा वाटा आहे.त्यांनी विविध प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.त्यामुळे शैक्षणिक जीवनातील अनेक महत्वाच्या अनेक पायऱ्या मी यशस्वीपणे पार करू शकलो.तसेच मला शैक्षणिक क्षेत्रात लाभलेले विविध मान्यवर सुद्धा माझे गुरूतुल्यच आहेत.

 

 

श्री प्रकाश भिमराव हेडाऊ(स.शि)

जि.प.प्राथमिक शाळा ईटान-२. प.स. लाखांदूर जि.भंडारा

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com