नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
भंडारा -जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गेल्या चार पाच दिवसां पासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पवनी तालुक्यात सर्वञ पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.परीणामी जनजिवन विस्कळीत झाल्याचे चिञ दिसून येत आहे.
आसगांव परिसरातील अनेक गावामधे वैनगंगा नदीला पूर आला असून वलनी , मांगली , पौना ,रानपौना शिवणाळा , , , , जुनोना , वडेगाव या भागात शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
सततधार पावसामूळे जून्या पडक्या घरांची पतझड झाली असून अती पावसामूळे गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे खुले केल्याने नदी नाल्याची पातळी वाढल्याने अती पावसाने पूरस्थीती निर्माण झाली. या पुरामूळे शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला सोयाबिन व धानपीकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. काही शेतकरी शेतात धान रोवणी सुध्दा केली होती.माञ अती पावसामुळे रोवणी कुजली व सदर धान पीक नदी नाल्या जवळील भागातील पिक पुराच्या पाण्याखाली सापडल्याने खराब झाल्याने दुबार पेरणीचे संकट अथवा शेती पडीत ठेवण्याची वेळ शेतकर्यावर आलेली आहे. पावसामूळे वाहतूक सुध्दा खोळंबली असल्याने शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकर्याची होत असलेलं नुकशान लक्षात घेता दुबार पेरणी साठी मोफत बियाणे व आर्थीक मदत देण्याची मागणी चंद्रशेखर पडोळे पवनी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे.
गोसेखुर्द धरणाच्या सतत 33 दरवाजांनी खुले केल्यामुळे होणाऱ्या आणि सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतकयाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहे . त्यामुळे शासनाने भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर पडोळे यांनी केलेली आहे.