नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : सेंदूरवाफा येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथ.शाळा क्र.०१ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी येथील पोलीस ठाणे छायाचित्रकार महेश वाघदेवे यांची निवड करण्यात आली. 

              साकोली – सेंदूरवाफा येथील प्रभाग ०४ तील जि.प.वरीष्ठ प्राथ.शाळेत गुरूपुर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गिता बोरकर, लेखराम चांदेवार, शिक्षक एम. ठाकरे, जागेश्वर पोगडे आणि सर्व शिक्षक कर्मचारीवर्ग हजर होते. याप्रसंगी महेश वाघदेवे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्वानुमते व पालकांच्या निवडीने अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक शिक्षिका व पालकांनी महेश वाघदेवे यांचे स्वागत करीत अभिनंदन केले. वाघदेवे हे पोलीस ठाणे येथील घटनांविषयक छायाचित्रकार असून सेंदूरवाफातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. यांच्या निवडीबद्दल पोलीस कर्मचारी, नवप्रहार मिडीयाचे आशिष चेडगे, यशवंत कापगते उमरी प्रतिनिधी, दिगंबर सुर्यवंशी, प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सचिव मनिषा काशिवार, संजय भोले नवप्रहार जिल्हा प्रतिनिधी, ताराचंद कापगते, निलय झोडे, ऋग्वेद येवले, चेतक हत्तीमारे, शेखर इसापुरे, मनोज गजघाट, रवि भोंगाणे, यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्यात.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com