निरा नरसिंहपुर दिनांक:14
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राभर संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जोमाने कामाला लागणार आसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील यांनी केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.यावेळी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार,प्रातांध्यक्ष जयंतराव पाटील,माजी मंत्री छगन भुजबळ, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे,खासदार सुप्रियाताई सुळे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे,सुरज चव्हाण यांच्यासह राज्यातील युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून संग्रामसिंह पाटील यांना बोलण्याची संधी मिळाली, यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की,महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की,जो चांद्या पासून बांधापर्यंत जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे.त्यामुळेच आपल्या पक्षाचा जनाधाराचा आलेख सतत उंचावत आहे.
देशाच्या राजकारणात आदरणीय पवार साहेब हे दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे.त्यामुळे अनेक तरूणांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीचे सोने करण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच आगामी निवडणूकांच्या तयारीला लागून संबंध महाराष्ट्राभर राष्ट्रवादी चे जाळे मजबूत करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपला पक्ष नंबर एकवर आणू हा ठाम विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आजपर्यंत बावड्याच्या पाटील घराण्यातून फक्त हर्षवर्धन पाटलांनी राज्य पातळीवर काम केले होते.परंतु गेल्या वर्षी गावकी-भावकीच्या राजकारणास कंटाळून माजी सभापती प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला होता.आणि लागलीच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशांत पाटील यांचे चिरंजीव संग्रामसिंह पाटील यांना ताकद देत प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली.आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती होताच त्यांनीही आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात बावड्याच्या दोन पाटलांची वर्चस्वाची लढाई तालुक्याला बघायला मिळणार असल्याची चर्चा सध्या बावडा परिसरात रंगली आहे.