निरा नरसिंहपुर दिनांक:14
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
इंदापुर तालुक्यातील14 तलावात पाणी सोडले जाणार आहे. अशी माहिती माजी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली.
या संदर्भात दत्तात्रय भरणे यांनी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे खडकवासला कालव्याला इंदापूर साठी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली होती यानंतर दत्तात्रय भरणे यांचे सूचनेवरून चोपडे यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना सूचना देत खडकवासलाद्वारे इंदापुरातील पाझर तलाव भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यानुसार आज पासून इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी खडकवासलाद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी इंदापूर तालुक्यात चार दिवसात पोचणार आहे त्यानंतर तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार आहे. सध्या राज्याच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस सुरु आसला तरीही इंदापुर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही . इंदापुर तालुक्याच्या एका बाजुला निरा तर दुसऱ्या बाजुला भिमा नदी आहे . या दोन्ही नदयाच्या मधल्या भागांमधील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान 14 पाझर तलावांची निर्मिती केली आहे . हे तलावांमध्ये खडकवासला कालव्याच्या माध्यमतुन पाणी सोडण्यात येते .
खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.
सध्या इंदापूर तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे विहिरी आणि कुपनलिका यांच्या पाणी पातळी येथेही वाढ झालेली नाही याशिवाय तलावधी कोरडे आहेत तसेच शेतकऱ्यांनी उसाच्या लागणी सुरू केल्या आहेत. या उसाच्या लागण्यांना सध्या मुबलक पाण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांची शेततळी देखील सध्या कोरडी आहेत. शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी आवर्तनात शेततळ्यामध्ये पाणी भरता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाही आवरतानाद्वारे अपेक्षित तरी देखील पाणी भरता येणार आहेत.