पारशिवनी:- तालुका तिल पोलिस स्टेशन कन्हान हदीतील हनुमान नगर कन्हान पानी टाकी जवळ भाड्याने राहणारे राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर हे परिवार सह काही कामा निमिताने वाहेर गेले असता बुधवार ला कालरात्रि माझे घराच मागील दाराचे कुंडी लावुन समोरील दाराला कुलुप लावुन गेलो होतो . आज सकाळी घरी आल्या वर दाराचे कुलुप उघडुन आत गेलो . तेव्हा माझे बेडरुम मधील लोखंडी आलमारीचे लॉक तोडुन आलमारी मधील सामन व कपडे खाली पडलेले दिसले व मागील दाराची कुंडी तुटलेली दिसली . तेव्हा मी आलमारी मधील ठेवलेले 35,000 / – रुपये पाहीले असता रुपये दिसले नाही . तेव्हा समजले की काल बुधवार दि .13 / 07 / 2022 चें सायं 07/30 वा . ते आज गुरुवार चे दि . 14/07/2022 चे सकाळी 10/30 वा . दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरांनी माझे राहते घराचे मागील दाराची कुंडी तोडुन घरात प्रवेश करून बेडरुम मधील लोखंडी आलमारीचे लॉकर तोड़न 35,000 / – रुपये चोरुण नेले आहे . तक्रारदार राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर राहणार श्री ज्ञानेश्वर विद्ये यांचे घर हनुमान नगर कन्हान च्या तक्रारी वरून. कन्हान पोलिसानी कलम४५४,४५७,३८० भादवी अन्वये गुन्हा नोद करून गुन्हा ची पुढील तपास कन्हान पोस्टे चे निरिक्षक विलाश काळे यांचे मार्गदर्शनात पो हवा खुशाल रामटेके, पो ना मंगेश ढबाले पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत तपास करित आहे.