नवेगाव खैरी नेऊरवाडा गट ग्राम पंचायत मध्ये अखेर भाजपा चा कब्जा सरपंच पदी फजीत सहारे तर उपसरपंचपदी ललिता राऊत ची बिनविरोध निवड…

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत नवेगांव खैरी नेऊरवाडा ची सरपंच व उपसरपंच पदासाठी ०४ मे गुरुवारी रोजी निवडणूक पार पडली. त्यात नवेगाव खैरी नेऊरवाडा ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा चे फजीत रामाजी सहारे सरपंच पदी तर सौं ललिता युवराज राऊत यांची उपसरपंच पदी निवड झाली. 

    नवेगांव खैरी नेऊरवाडा गट ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ असून दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक निवडणूक झाली. त्यात कॉंग्रेस गटाचे ६ तर भाजप गटाचे ३ असे सदस्य निवडून आलेत.त्यामुळे ९ पैकी ६ सदस्यांमधून कमलाकर कोठेकर यांची सरपंच पदी तर राजू पुरकाम यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड झाली होती. मात्र एक वर्षानंतर सरपंच व उपसरपंच यांच्या एकलधोरणी कारभारामुळे सरपंच समर्थक सदस्य नाराजीचे सुर काढायला लागले. शेवटी प्रकरण टोकावर पोहचत एकल धोरणी कारभारी सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात पावित्रा उचलून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ,चे सुधारित कलम ३५ अन्वये सरपंच व उपसरपंच दोघांनाही पदावरून उतरवण्यासाठी विरोधी गटाच्या बाजूने समर्थन करुन प्रतिक्षा करत होते. मात्र सुधारित नियमानुसार अविश्वास पारित करण्यासाठी दोन वर्षाची प्रतिक्षा करावी लागली.दोन वर्षाचा कार्यकाल संपताच अविश्वासाची नोटीस तहसीलदार प्रशांत सांगडे कडे ११ एप्रिल रोजी सादर केली. त्यानुसार तहसीलदार प्रशात सांगडे यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्तावर विचार करण्यासाठी १७ एप्रिल रोजी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा बोलावली होती. तेव्हा सरपंच व उपसरपंचा वर अविश्वास प्रस्ताव पारीत झाला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी नव्याने सरपंच व उपसरपंच निवडणूकीचा कार्यक्रम ४ मे रोजी घेण्याचे पत्र काढले. त्या कार्यक्रमात सकाळी गुरुवार ला सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारले.त्यात सरपंच पदासाठी भा ज पा चे फजीत रामाजी सहारे तर उपसरपंच पदासाठी व ललिता युवराज राऊत. यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.विरोधात एकही नामनिर्देशन पत्र सादर केले नाही. 

    विशेष सभेची सुरुवात दुपारी २ वाजता झाली. 

     नामनिर्देशन पत्राची छाननी दुपारी.२-१५ वाजेपर्यंत चालली. छाननीत दोन्ही नामनिर्देशन पत्र वैद्य ठरले. सरपंच व उपसरपंच विरोधात नामनिर्देशन पत्र नसल्यामुळे अखेर भाजपा चे फजीत सहारे सरपंच पदी तर ललिता राऊत उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी सभेत ९ सदस्यांपैकी फजीत सहारे,उमा तेलोते,चंद्रकला भिमटे, वनीता वासनिक, शोभा करणकार,जोयोत्सना राऊत,ललिता राऊत असे ७ सदस्य उपस्थित होते. तर कमलाकर कोठेकर व राजू पुरकाम हे गैरहजर राहिले. 

   याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी म्हणून राजेश घुडे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली तर ग्रामसेवक स्वप्नील गोस्वामी यांनी सहकार्य केले. 

नवेगाव खैरी नेऊरवाडा गट ग्राम पचायत मध्ये भाजपा चा झंडा फड़क वीणे साठी माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी व भाजपा जिला उपाध्यक्ष रेखाताई दुनेदार यांनी भरघोष प्रयत्न केले हे विशेष.