युवराज डोंगरे/खल्लार
माकडांच्या हैदोसामुळे कौलारु घराची नाट तुटल्याने घर पडल्याची घटना आज 14 जुलैला सकाळी 6 वाजता रुस्तमपूर येथे घडली असुन सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
रुस्तमपूर हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेवटचे छोटेसे गाव पुढे अकोला जिल्हा सुरु होतो या गावात राहुल हरीचंद्र खडे यांचे कौलारु घर आहे या घरात राहुल खडे पत्नी व एक लहान मुलगी यांच्यासह वास्तव्यास आहे आज 14 जुलैला सकाळी 6 वाजताच्या सुमारास माकडांनी हैदोस घातला यात खडे यांच्या कौलारु घराची नाट तुटूली व घराचा अर्धा भाग पडला नेमक याचवेळी राहुल खडे हे लहान मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते तर त्यांची पत्नी हि बाजूलाच चहा बनवित होती सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही हल्ली ग्रामिण भागात माकडांचा हैदोस खूप मोठ्या प्रमाणात वाढला असुन वन विभागाने याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे