बल्लारपूर तालुका ग्रामीण

विवेक रामटेके

 

बल्लारपूर- चंद्रपूर जिल्हात मागील चार दिवसांत मुसळधार पावसाने संततधार पणे हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुकाच जलमय झालेला आहे. सततच्या पावसामुळे बल्लारपूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. यात धान, कापूस, सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला आहे. याचसोबत बल्लारपूर तालुक्यातील जवळपास पन्नास घरांची पडझड झालेली असल्याची माहिती तहसीलदार संजय राईंचवार यांनी दिली आहे.

बल्लारपूर तालुक्यात कोठारी, बामणी (दु), विसापूर, कडमना, काटवली – बामणी, नांदगाव पोडे, आमडी, मानोरा, किन्ही, ईटोली, पळसगाव, दहेली, लावारी, आसेगाव, गिलबिली या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गावागावांतील चौक, रस्ते, शेत रस्ते जलमय झाले. सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्के पर्जन्यमान झाले. या पावसामुळे बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात पन्नास घराची पडझड झाली असून अनेकांचा निवारा हिरावला गेला आहे. त्यामुळे गरीबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

बल्लारपूर शहरात १०, विसापूर १०, बामणी (दुधोली) २, चारवट ५, नांदगाव पोडे ५, कोठारी १०, मानोरा ३, ईटोली २, गिलबिली ३ असे एकूण ५० घरांची पडझड झाली आहे. गेली चार दिवस संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला जरी असला तरी ईरइ च्या धरनाचे दरवाजे उघडले गेल्याने वर्धा नदीला मोठा पूर आलेला आहे. त्यामुळे बल्लारपूर, गोंडपिपरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, आमडी, पळसगाव, कळमना, लावारी, बामणी, नांदगाव पोडे, काटवली – बामणी तसेच गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी, लाठी, पारडी वामनपल्ली, सोनापूर, पोडसा, वेडगाव आदी गावातील शेतकऱ्यांना जबर फटका बसला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गढूळ पाण्यामुळे अंकूर आलेले रोपटे कुजण्याच्या तयारीत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची झड बसली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नदी, नाल्याच्या पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

अतिवृष्टीमुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावातील घरांचे व शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्याच्यापुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शासनाने वेळीच दखल घेऊन पडझड झालेल्या घरांचे व पुराच्या पाण्याखाली आलेल्या शेतपिकांचे सर्वेक्षण करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी भिम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने केली आहे.

अतिवृष्टीमुळे बल्लारपूर तालुक्यातील ५० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. काहींच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर काहींचा निवारा हिरावला गेला आहे. संबंधित तलाठी मार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पात्र नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून उपाययोजना केली जात आहेत. तसेच पुरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पात्र शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी शासण स्तरावर पाठपुरावा केला जाईल. अशी माहिती संजय राईंचवार तहसीलदार, बल्लारपूर यांनी दिली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com