तालुका प्रतिनिधि
अमान कुरेशी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही
दोन दिवसापूर्वी महावितरण व अन्य कंपनी ने घोषित केलेल्या विजवाढ च्या विरोधात आम आदमी पार्टी द्वारा सिंदेवाही तहसीलदार ला निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वाढीत वीज दर रद्द करणे , शिवसेनेच्या वचननाम्या प्रमाणे ३०० युनिट ३० % दर कमी करणे आणि २०० युनिट मोफत देण्यायावे महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि . एप्रिल २०२० पासून २० % वीज दर बाढ करण्यात होती. त्यामुळे देशाल महागडी वीज राज्यात आहे . तरीही आता आपले सरकार आल्याबरोबार आपणही २० % पर्यंत या महिण्यापासून भाव वाढ केली आहे . शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३० % स्वस्त वीज देवू , तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे . एवढंच नव्हेतर याचा सरकार असतांना मागच्या दोन वर्षात बीजेपी व स्वता मा देवेंद्र फणवीस यांनी वीज दर वाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केले … दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागिल आठ वर्षापासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणान्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे . तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे . तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवत मान्न सरकार ने सुद्धा दि . १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे . आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर जावून जनतेची लूट होत आहे . ही सावकारी लुट यांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे . आता आपले सरकार आले आहे . आणि आपण राज्यातील जनतेला न्याय देण्याबाबत विश्वास देत आहात , तसेच महाआघाडी सरकार असतांना श्री देवेंद्र फडणवीस याच मागण्या करीत होते . आता तेही आपल्या सोबत सरकार मध्ये आहेत त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे स्वतः लक्ष देवून खालील मागण्या तातडीने मंजूर करण्यात यावी , आज आम्ही आन्दोलनाच्या माध्यमातून करीत आहोत . राज्यात जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी . आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे ३० % स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी . वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे , राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी .आंदोलनात आप चे मनोहर शामराव पवार ,राहुल नागपुरे,भूषण गजभिये,तुषार खंडारे, निवेदिता पवार, चिंतामन गजभिये, विनायक गजभिये,रमेश निकुरे,अज़हर पटेल, वंदना गजभिये, पंकज,स्वप्निल,रूपेश कावड़े,विलास जेंगड़े, किशोर मेश्राम,विलास गयेवार, विलास धुलेवार आदि उपस्थित होते।