दिनेश बनकर

कार्यकारी संपादक

दखल नुज भारत 7822082216

दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज 13 जुलै राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी गडचिरोली यांना आप तर्फे निवेदन देण्यात आले.   

‘महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज ३०% स्वस्त देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने , आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे , दरवाढ मागे घ्याच शिवाय आता ही ३० टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे दाखवून द्या  ‘ असे आवाहन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. 

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच पंजाब मध्ये नव्याने आलेल्या आपच्या भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आजच्या निवेदनातून ‘ राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. वीज कंपन्यांचे कॅग / CAG ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अश्या मागण्या आज आम आदमी पार्टीने केल्या आहेत . जनतेच्या मनातही वीज बिल बाबत मह्विकास आघाडीवर रोष होता आता  नव्या सरकारला या मुद्द्यावरून आम आदमी घेरणार असे दिसते आहे .  

आजच्या आंदोलनाचे नेतृत्व  आप चे जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी केले, जिल्हा सचिव भास्कर इंगळे,कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, डॉ सुरेश गेडाम,शहर संयोजक कैलास शर्मा, संतोष कोटकर, महिला संयोजक अल्का गजभे, शहर संयोजक समिता गेडाम,मीनाक्षी खरवडे,हितेंद्र गेडाम,नामदेव पोले, गणेश त्रिमुखे,सोनल ननावरे,प्रमोद वाटे,कृष्णा खेवले,सुजाता मांडवे,प्रशिका पेटकर,ज्योती सायलवर, शिल्पा पेटकर, एकनाथ गजभे,प्रसाद खरवडे,दिवाकर साखरे आदी कार्यकर्ते सामील झाले होते. 

दु 13 जुलै 2022

 

    

     

 

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com