नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 

भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील दांपत्यासाठी सन 2019-20 पासून तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द दांपत्यांसाठी सन 2002-03 पासून कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या वधुचे पालकास 20 हजार व संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार अनुदान देण्यात येते.

सन 2022-23 वर्षाकरिता या योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचेकडे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रांसह 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे उपलब्ध आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com