नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

भंडारा : गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस झाल्यामुळे भंडारा येथे पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यात २१ गेट २ मिटरने तर, १२ गेट १.५ मिटरने उघडले आहे. यातून १२३०६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धापेवाडा बॅरेजचा विसर्ग ६३२२ क्युमेक्स व माथनी सरितामापन केंद्राचा विसर्ग ६४७० क्युमेक्स असा एकूण येवा १२७९२ क्युमेक्स आहे. भंडारा येथे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते व धरणाची पातळी कमी करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रात्री ७ वाजता १२ गेट १.५ मिटरने तर, २१ गेट १ मिटरने उघडून त्यातून ८३७२ क्युमेक्स पाणी सोडण्यात येत होते. मात्र, जलसाठ्यात वाढ झाल्याने रात्री १० वाजता पाणी विसर्गाचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com