दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील राम नगर पोलिस स्टेशन चे विभाजन करुन शास्त्री नगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा व शहरात नवीन पोलिस स्टेशन निर्माण करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली ; फडणवीस यांनी तत्काळ निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांना दिले.

चंद्रपूर शहरातील राम नगर पोलिस स्टेशनची हद्द खूप मोठी असल्याने तेथील पोलिस कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार येऊ लागला आहे. याचा परिणाम अप्रत्यक्षपणे कायदा आणि सुव्यवस्थेवर होत असल्याचे जाणवते आहे. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक ९४ पोलिस अधिकारी, कर्मचारी याच्या अतिरीक्त पदांचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे; चंद्रपूर शहरातील २२ वॉर्ड आणि लगतची २१ गावे या पोलीस स्टेशन ला जोडली जातील असा प्रस्तावही आहे.

सदर पोलिस स्टेशन करिता आवश्यक ईमारत, जेथे सद्यस्थितीत चौकी आहे तेथेच उपलब्ध असल्याचेदेखील शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ५ ऑक्टोबर २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना यासंदर्भात अहवाल सादर केला होता.

शास्त्रीनगर पोलिस स्टेशन ची निर्मिती ही या भागातील नागरिकांची आग्रही मागणी असून वाढत्या चंद्रपूर शहराची ती गरजदेखील बनली आहे. त्यामुळे तातडीने यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com