पुणे जिल्हा प्रतिनिधी
खानापूर ते रांजणे फाट्याला जोडणारा दुवा म्हणजे असणारा पुल परंतु ह्या मुख्य रस्त्याचे मागील दोन वर्षापासून काम सुरू आहे. पर्यायी रस्ता म्हणून बाजूने कच्च्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु हा कच्चा रस्ता आता पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावरून वेल्हे तालुक्यात तसेच पानशेत परिसरात सतत वाहतूक सुरू असते. लोकप्रतिनिधी विकासकामे करतात परंतु ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरूनच का कामे करतात, असा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे. विकासकामे करत असताना पावसाळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामे पूर्ण का होत नाही. अनेक गावातील लोक ये जा करत असतात या रस्त्याने मग हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण का केले गेले नाही.
राजकारणाची पातळी घसरली आहे म्हणून तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळ करू शकत नाही. ह्या पुलावरून पाणी वाहत असल्याने लोकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागत आहे. आता या परिसरातील नागरिक आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, काम जरूर सुरू आहे परंतु वर्षे इतकी का लागली, लोकप्रतिनिधींना आमच्या जीवाशी खेळायच आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.