एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व नागपूर जिल्हाध्यक्ष रोशनीताई गायकवाड यांच्या सोबत सविस्तर चर्चा… — नागपूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक पुढील आठवड्यात..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादक

            एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात संघटनेच्या बांधणीचे काम सुरू आहे.

        याचबरोबर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महा-शहरात एन.जागतिक मानवाधिकार संघटने द्वारा कार्यक्रमाचे आयोजन जुलै महिन्यात करण्याचे सुतोवाच महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी सोडले आहे.

         नागपूर महा-नगरात,एन.जागतिक मानवाधिकार संघटने द्वारा होणारा कार्यक्रम हा शिस्तबद्ध आणि उत्तम कार्यबध्द व्हावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी वर्तवली आहे.

          कार्यक्रमाच्या नियोजित संबंधाने व संघटनेच्या कार्यपद्धती बाबत महत्वपूर्ण चर्चा व्हावी अशी सुचना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मध्यमा मनिषा सवाई,महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे,महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दिक्षा कऱ्हाडे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष रोशनीताई सिध्दार्थ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्याकडे व्यक्त केली होती.

         त्यांच्या सुचनेचा आदर करीत महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी सदर सर्व पदाधिकाऱ्यां सोबत विविध विषयांवर प्रदिर्घ चर्चा केली.

       आणि जुलै महिन्यातील कार्यक्रमाच्या नियोजना संबंधाने नागपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा पुढील आठवड्यात शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणी घेण्याचे ठरविण्यात आले.

             नागपूर जिल्हाध्यक्ष रोशनीताई सिध्दार्थ गायकवाड यांच्या सखोल अभ्यासानुसार त्यांच्याच अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न होणार आहे.याबाबत तशा सूचना महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केल्या आहेत.

            महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सकारात्मक ठरली आहे.