नागरिकांना आता खड्ड्यांचा त्रास नाही, तक्रार करण्यासाठी बांधकाम विभागाचे नवे ॲप… पीसीआरएस ॲप डाऊनलोड करा आणि रस्त्यांचे खड्डे 72 तासात बुजवून घ्या :- कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांचे आवाहन 

 

युवराज डोंगरे/खल्लार

उपसंपादक

केंद्र शासनाच्या एम सेवा अँप मध्ये नागरिकांना रस्त्यावरील खड्डे विषयक तक्रार करण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने पोटहोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम म्हणजेच पीसीआरएस ऍप विकसित केले आहे यावर तक्रार करताच त्याचे 72 तासात निरसन होणार असल्याचे दर्यापूर कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांनी सांगितले असून नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून रस्त्यावरील खड्ड्यात बाबत माहिती देण्यासाठी आवाहन केले आहे.

खड्डे मुक्त रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस विकसित केले आहे या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्धार केला आहे सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नागरिकांनी पीसीआरएस सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या स्थितीसह खड्ड्याबाबत तक्रारी करून रस्त्याचे काम करून घेता येणार आहे.

—————————————-

मंत्रालयातून लक्ष राहणार

नागरिकांच्या तक्रारीची अंमलबजावणी न केल्यास सात दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे तरीही दखल घेतली न केल्यास महिनाभरात तो खड्डा बुजवून मुख्य अभियंतांनी संबंधितांची तक्रार दूर करणे अपेक्षित आहे ॲप मधील प्रत्येक हालचालीवर मंत्रालयातून लक्ष ठेवले जाणार आहे.

—————————————-

काय आहे पीसीआरएस ऍप

पीसीआरएस हे मोबाईल ॲप सार्वजनिक बांधकाम विभागाने google playstore उपलब्ध करून दिले आहे या ॲपच्या माध्यमातून नागरिक बांधकाम विभागाच्या आखत्यारीथील रस्त्यावर असलेल्या खड्ड्याची तक्रार करू शकतील तक्रार आल्यानंतर संबंधितांकडून त्याची दखल घेतली जाईल.

—————————————-

नागरिकांनी कोणत्याही रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा फोटो त्वरित काढून अपलोड करून बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जाऊन सामान्य नागरिकांचा त्रास कमी होईल यासह बांधकाम विभाग व नागरिक यांच्यामध्ये सुद्धा समतोल साधला जाईल.

प्रतिक गिरी

कार्यकारी अभियंता

सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर