रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी उपविभागातील दक्षिण भागातील सिरोचा तालुक्यातील तालुका मुख्यालय पासून ५०किलोमिटर अतरावर असणाऱ्या झिंगानुर परिसरात झिंगाणुर सह सात ते आठ गावात पाण्याची भीषण समस्या राहते.जल ही जीवन असल्यामूळे पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्यात यावी. यासाठी आदिवासी आघाडी कार्यकारी जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी आदिवासी विकास मंत्री डाक्टर विजय कुमार गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
झिंगानुर परीसरात बोअरवेल ३००ते ३५०फूट खोदल्यावरही पाणी लागत नाहीं विहिरीला पाणी कधीच राहत नसल्यामुळें झिंगणुर सह परिसरातील सात ते आठ गावांना गावाच्या बाजूंनी सात किलोमिटर अंतरावरून वाहणाऱ्या नाल्यावर पिण्याच्या पाण्यासह घरातील इतर कामासाठी लागणाऱ्या पाणी साठी आवलंबून राहावे लागते.
आता हि पाण्याची समस्या ही १२महिन्याची झाली आहे.त्यामुळे झिंगानुर वरुन अंडाजे १२ते १५किलोमिटर वर छत्तीसगड महाराष्ट्र दोन राज्याच्या मधून १२महिने वाहणारी इंद्रावती नदी आहे.तिथून पाईप लाईन टाकून पाणी आणून टाकी द्वारे पाणी प्रतेक गावात पोहचवू शकतो.त्यामुळं तशी वेवस्थ केल्यास झींगणुर सह परिसरातील सात ते आठ गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटून हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. तसेच येथील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होइल.तरी या गंभिर समस्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊनसमस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली.