ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी रामकृष्ण पत्रु मेश्राम, सिंधुताई रामकृष्ण मेश्राम मु.पो.वैरागड,ता.आरमोरी,जिल्हा- गडचिरोली,सर्वे नं 413/2 – 414/2 जवडपास 2,50000 रू. किमतीची नुकसान झालेली आहे यात पाणी लावायचे काळे पाईप 25 तोड फोड व बोर मशीन तोड फोड केलेली आहे बोर मशीन आत मध्ये गेली आहे.
बीबीकाही दिवस आरमोरी तालुक्यातील रवी मुलुर चक कडे हत्तीचा मुक्काम होतो परंतु दोन दिवसा पासून हत्तींनी आपला मोर्चा तिथून हलवून पाथरगोटा ते शंकर नगर मार्गे मंजेवडा रीठ वरून सालमारा गावा जवडून जात सरळ रात्री पाच पांडव जवळील मेश्राम यांच्या शेतात शेत तळ्यात अंगोळ करीत त्यांच्या शेतात संपूर्ण तीन एकर जागेत लावलेला रब्बी धान पीक उद्ध्वस्त केला. तेवीस हत्ती आणि दोन हत्तीचे पिल्लू असे एकूण पंचवीस हत्तींनी सुंदर धानाची नासधूस केली आहे सदर शेतकऱ्यावर खूप मोठे संकट उभे झाले असून वनविभाग मात्र बध्याची भूमिका घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्ष त्या स्थळी वनविभागाची टीम हजर असूनही अजून पर्यंत पंचनामा केलं नसल्याने शेतकरी वर्ग संताप व्यक्त करीत असून हत्तीचा बंदोबस्त करावं अशी मागणी होत आहे.