युवराज डोंगरे/खल्लार प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अमोल कथलकर यांनी पोलिस सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत खल्लार येथील निराधार असलेले वयोवृध्द नागरिक सुखदेव मोहोड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनी नविन वस्त्र देऊन आपली पोलिस खात्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी खल्लार पोलिस स्टेशनमधिल अमोल कथलकर यांच्यासहित शरद डहाके, परेश श्रीराव, राजेश राऊत, विद्याभूषण पटवर्धन, प्रविण ठाकरे,माधुरी जुनघरे हे पोलिस कर्मचारी व खल्लार मधिल नागरिक उपस्थित होते.कथलकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे खल्लार मधिल नागरिकांनी कौतुक केले आहे.