कोरची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन… — दैनिक‌‌ वृत्तपत्राचे महत्व पटवुन विघाथीं मोबाईलच्या आहारी जाण्यापेक्षा शिक्षणा सोबत वृत्तपत्राचे वाचन करावे‌ असे ‌आवाहन‌‌ राष्ट्रपाल नखाते यांनी केले.

ऋषी सहारे 

संपादक

    कोरची:: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कांता साखरे यांनी भूषविले. उद्घाटक प्रमोदिनी काटेंगे ,प्रमुख पाहुणे मारोती अंबादे ,महेश जाळे ,आरती चांदेकर, सोनाली सोरते डॉ.नरेश देशमुख,राष्ट्रपाल नखाते दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधि कोरची‌ होते . विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर भाषणे दिली. सर्व शिक्षकांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व पटवून दिले. ‘वाचाल तर वाचाल ‘ याप्रमाणेच वाचनाचे महत्व सांगण्यात आले.शिक्षणा सोबत वृत्त वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे. वाचक बनावे असे सांगण्यात आले .राष्ट्रपाल नखाते यांनी विघाथींनी शिक्षणा सोबत देशोन्नती वृत्तपत्राचे वाचन करावे तालुक्यात किंवा जिल्हयात काय चालु आहे यांची माहिती वृत्तपत्राव्दारे माहित होते.

    कार्यक्रमाचे संचालन सोनाली सोरते यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती चांदेकर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.