उमेश कांबळे ता प्र भद्रावती
स्थानिक नवीन बस स्टँड भद्रावती येथे आटोरिक्षा असोशियन भद्रावतीच्य्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले
व भीम गिताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
आटोरिक्षा असोशियन भद्रावतीच्य्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व् त्यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात राजू गैनवार नगरसेवक यानी बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील योगदान व त्यांच्या विचाराची गरज आहे असे बोलताना, लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संरक्षनासाठी व राष्ट्रच्या उभारणीसाठी माझ्या भारतीय बांधवांनो आज देशाला कशाची गरज असेल तर लोकांच्या मनात राष्ट्रियतेची भावना होय जातीभेद – वर्णभेद टोकाचे वर्गभेद – विद्यमान असल्यास लोकशाही असून नसल्यासारखी असते ,
सतत क्रांतिकारी पूनर रचना्
कक्षविहीन बंधुभाव आणि
भगिनी भाव मुक्त मनस्कता
संपूर्ण इहवाद विचारात आणि वर्तमानात सतत प्रकाशत राहणारी सम्यकता एक व्यक्ती एक मूल्य उरात वागवनारा समाजवाद या गोष्ठीनी फुलणारं आणि मानसालाच जीवनाचे – परमसाध्य – परमसत्य आणि परमसौंदर्य माननाऱ्या असीम मनाचा समाज बाबासाहेबांच्या प्रयोगशिल तत्वद्यानाला हवा आहे. मानसाला असीम माणूस आणि सम्यक प्रतिभा करणारे जगातले हे सर्वोत्तम जीवनविद्यांन आहे आणि सौंदर्यशास्त्रही आहे या जीवन विज्ञानाचे आणि सौंदर्य शास्त्राचे नाव म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहे. असे मनोगत व्यक्त केले.
या सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाखा शेळकी, मुख्यधिकारी नगर परिषद भद्रावती,
समितीचे अध्यक्ष दिवाकर साखरे,
प्रमुख पाहुणे अनिकेत सोनवणे तहसीलदार, अनिल धानोरकर अध्यक्ष नगर परिषद, राजू गैनवार नगरसेवक, बाळू उपलंचीवार अध्यक्ष ऑटो असोशियन, विकास शेंडे माजी अध्यक्ष अटो असोशियन, प्रकाश पिंपळकर प्राचार्य , सुशील देवगडे नगरसेवक, नागेंद्र चटप्पलीवार, डॉ प्रा जयवंत काकडे प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित ‘होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजू चूनारकर यांनी केले