महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी कार्यकर्ते वसंत कुलसंगे यांनी केले एक दिवसाचे उपोषण…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

गडचिरोली :- बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी सुप्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे यांनी गुरुवारी शहरातील इंदिरा गांधी चौकात एक दिवसाचे उपोषण केले.

          श्री.कुलसंगे यांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण केले. या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक बौद्ध अनुयायी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपोषणस्थळाला भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा देत होते.

        एखाद्या गैर-बौद्ध व्यक्तीने बौद्ध मंदिराच्या मागणीसाठी उपोषण करण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे, ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.

         विशिष्ट श्रद्धेचे धार्मिक स्थळ त्या समुदायाला परत दिले जात नाही हे बौद्ध धर्मीयांवर केवळ गंभीर अन्यायच नाही तर पूर्णपणे असंवैधानिक आहे, असे श्री. कुलसंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले. मला हे कृत्य खूप चुकीचे वाटले म्हणून मी हे उपोषण केले, असे ते म्हणाले.

          श्री.कुलसंगे यांनी इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह संध्याकाळी भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आणि बोधगया महाविहार त्वरित बौद्धांना सोपवण्याची मागणी केली.

         जिल्हाप्रमुख श्री.तुलाराम राऊत, बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव प्रा.गौतम डांगे, संविधान फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गौतम मेश्राम, रिपब्लिकन पक्षाचे प्रदीप भैसारे, सिद्धार्थ खोब्रागडे, बसपाचे भास्कर मेश्राम, सुधीर वालदे, पीआरपीचे मुनीश्वर बोरकर आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन या मागणीला पाठिंबा दर्शविला.

          बहुजन मुक्ती पार्टीचे श्री.भोजराज कान्हेकर, बाळकृष्ण बांबोडे, बीएसआयचे एन.एम. वानकर, सुखदेव वासनिक, पंचशील बुद्ध विहारचे गौतम दुर्गे, प्रबुद्ध विहार समितीचे अमरकुमार खंदारे, शांतीलाल लाडे, बौद्ध नेटवर्कचे प्रमोद राऊत, लहुजी रामटेके, रामदास टिपले, कु.पोर्णिमा कुलसंगे, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या पदाधिकारी सुमित्रा राऊत, नजरिका मशाखेत्री, अर्चना भैसारे, शशीकला सहारे,यशोधरा जांभुळकर, शीतल भैसारे, दमयंती सहारे,शीतल सहारे, ज्योती उराडे, तालुका अध्यक्ष एम. एन. वनकर, प्रेमदास रामटेके इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीला आपला पाठिंबा जाहीर केला.

        सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद महादेव मेश्राम यांचे हस्ते उपोषण कर्ते वसंतराव कुलसंगे यांना सायंकाळी लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता झाली.