भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
जाॅकाई देव सुधार समिती तथा ग्रामसभा इलाका महासंघ दूधमाळा यांच्यातर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जत्रा भरवण्याची परंपरा सुरु आहे.
आधी तिथे शिवमंदिर असल्याचे सांगितले जाते. हे शिव मंदिर दुर्लक्षित आहे. हे मंदिर कठाणी आणि नदीच्या काठावर वसलेले होते ते पुरातन मंदिर होते. त्यातील असलेल्या दगडी अवशेषावरून दिसून येते.
हे पुरातन मंदिर दूधमाळा गावापासून एक किलोमीटर अंतरावर कठाणी नदीच्या काठावर आहे. 14 गावाचा इलाखा महासंघ आहे त्यामध्ये प्रामुख्याने दुधमाळा नवरगाव भुराणटोला काकडयेली गीरोला परसवाडी उदेगाव फाशीटोला मिरजगाव बु मिरगाव खुर्द देऊळगाव गुजणवाडी एरंडी राजोली अशा 14 गावांचा समावेश होतो.या 14 गावांमध्ये पूर्वीच्या काळी मडावी परिवाराची जमीनदारी असल्याचे बोलले जाते.
याच जमीनदाराच्या हस्ते काला केल्या जातो तसेच झित्रू कोवे हा भूम्या पूजारी नवरगाव यांच्या हस्ते मंदिरातील पूजा अर्चना केली जाते. असे यशवंत मोहुर्ले उपसरपंच दूधमाळा यांनी सांगितले.
येथील मंदिर पहिले भग्न व पडीत अवस्थेत होते त्या ठिकाणी डॉक्टर नामदेव उसेंडी माजी आमदार यांनी त्या ठिकाणी मंदिरासाठी सभामंडप मंदिराच्या जीर्णोद्धार त्यांच्या कारकीर्दीमध्ये करून दिला. मंदिराच्या पुढे 200 मीटर अंतरावर जाॅकाई देव आहे.हे देव उंच दगडावर डोंगरावर आहे तेही भगना अवस्थेत आहे.
जाकाई देव सुधार समिती ग्रामसभा इलाका 14 गावाचा समावेश असून त्यात इलाकाच्या माध्यमातून सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू आहे. 14 गावातील नागरिक भक्त दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी घट बसतात व दुसऱ्या दिवशी जत्रा भरवली जाते.
जत्रा भरवण्याची परंपरा मागील 25 वर्षापासून सुरू आहे असे प्रतिनिधीशी बोलताना उपसरपंच मोहरले यांनी सांगितले. या ठिकाणी आदिवासी बांध साखर दंडाने स्वतःला मारतात त्याचे मारण्याची परंपरा आदिवासी देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आहे असे सांगितले.
त्याठिकाणी छोटे मोठे दुकाने स्टॉल लागलेले होते. त्यामुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु ही जत्रा व शिवमंदिर दुर्लक्षितच आहे. तरीपण या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात.दरवर्षी संख्या वाढत जात आहे या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी तेथील नागरिकांची मागणी आहे.